Shivsena leader shaina N. C.  Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena Appointment: शिवसेनेच्या महिला नेत्याला राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी : राज्यसभेवेळी डावलल्याने होत्या नाराज

Shiv Sena woman leader gets national responsibility: शिवसेनेच्या प्रभारी राष्ट्रीय सचिवाची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी राज्यसभा निवडणुकीला डावललेल्या बड्या महिला नेत्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसापासून संघटनात्मक नियुक्तीवर भर देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून संघटना बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत.

त्यासाठीच गेल्या काही दिवसापासून राज्यभर शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून संघटनेशी शिवसैनिकांना जोडले जात आहे. त्या माध्यमातूनच नव्याने प्रवेश करणाऱ्याकडे जबाबदारी सोपवली जात असतानाच शिवसेनेच्या प्रभारी राष्ट्रीय सचिवाची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी राज्यसभा निवडणुकीला डावललेल्या बड्या महिला नेत्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) प्रभारी राष्ट्रीय सचिव पदावर शायना एन. सी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, ती 1 मे 2026 पासून एक वर्षासाठी लागू राहणार आहे. असे त्यांच्या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.

येत्या काळात शायना एन. सी. यांच्याकडे प्रामुख्याने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्व विचारधारा आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण लोकांपर्यंत सक्रियपणे पोहोचवणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे.

शायना एन. सी. यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोडून त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath shinde) शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये त्यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची मोठी जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती.

त्यानंतर एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभेच्या शिवसेनेला आलेल्या एका जागेवर उमेदवारी मिळावी यासाठी त्या इच्छुक होत्या. मात्र, त्या जागेवर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली होती.

त्यामुळे शायना एन. सी. यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांच्याकडे नाराजी दूर करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT