Shivsena News : ऑपरेशन टायगर आधीच एकनाथ शिंदेंना बसणार झटका; विधानपरिषदेला संधी न मिळाल्याने नाराज बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

Eknath Shinde Shiv Sena News : एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली आहे.
eknath Shinde
eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या दहा रिक्त जागेसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे सर्वच पक्षात नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली आहे. भाजपच्या वाट्याला जवळपास सहा जागा आल्याने त्या पक्षातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली आहे. विधानपरिषदेला संधी न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एक प्रमुख महिला नेत्या नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संधी न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील (Shivsena) शायना एनसी या महिला नेत्या नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल, असे त्यांना वाटले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचे नाव बदलून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, प्रहार पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकजण नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

eknath Shinde
MVA News: ठाकरेंच्या खेळीनं 'मविआ'त फूट? काँग्रेसला दानवेंची उमेदवारी खटकली, लवकरच मोठा निर्णय घेणार, सपकाळांनी तडकाफडकी गाठली दिल्ली

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून शायना एनसी यांना मुंबादेवीतून विधानसभेचं तिकिट देण्यात आलं होते. पण या मतदारसंघात तत्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून डिबेट शो मध्ये त्या शिवसेनेची बाजू मांडताना दिसत होत्या.

eknath Shinde
MVA News: ठाकरेंच्या खेळीनं 'मविआ'त फूट? काँग्रेसला दानवेंची उमेदवारी खटकली, लवकरच मोठा निर्णय घेणार, सपकाळांनी तडकाफडकी गाठली दिल्ली

दरम्यान, शिवसेनेतील शायना एनसी नाराज महिला नेत्याला विधान परिषद निवडणुकीत संधी दिली जाईल असे वाटत होते. मात्र, त्याना संधी मिळत नसल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेशासाठी काय शब्द दिला आहे याची चर्चा रंगली आहे.

eknath Shinde
Shivsena MLC Election: अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर होताच अंधारेंची भूमिका समोर; ठाकरेंसोबतचा 'मार्मिक' व्हिडीओ शेअर; 'कॅप्शन'मधून दिला मोठा संदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com