supreme court hairing  Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Supreme Court hearing : शिवसेना कोणाची, अंतिम निकाल कधी? ठाकरेंच्या वकिलाने दिली मोठी अपडेट

Supreme Court hearing schedule News : याबाबतचा अंतिम निकाल येण्यास उशीर लागणार असल्याचे दिसत असतानाच याबाबत प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक्सवरून ही माहिती दिली आहे.

Sachin Waghmare

सुप्रीम कोर्टात गेल्या दोन महिन्यापासून शिवसेना पक्ष व चिन्हावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे लवकरच याबाबत अंतिम निकाल येईल असे वाटत होते. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने ऑक्टोबरमध्येच म्हणजेच दिवाळीपूर्वी शिवसेनेवर सुनावणी पूर्ण होणार असल्याचे म्हटले होते. या प्रकरणावर अद्याप सुनावणी पूर्ण झाली नाही. पुढील सुनावणी आता दिवाळीनंतर होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सुनावणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अंतिम निकाल कधी येणार याबाबत उत्सुकता लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेवरील निकाल कधी येईल? यावर सरोदे यांनी भाष्य केले आहे.

सुप्रीम कोर्टात गेल्या दोन महिन्यापासून शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपलेला आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील ध्रुव मेहता यांनी बुधवारी सुनावणीवेळी जोरदार युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर आता या प्रकरणावर पुढील सुनावणी आता दिवाळीनंतर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निकाल येण्यास उशीर लागणार असल्याचे दिसत असतानाच याबाबत प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक्सवरून ही माहिती दिली आहे.

सत्तासंघर्ष प्रकरणात बुधवारी 15 मिनिटांचे कामकाज झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे अत्यंत हास्यास्पद म्हणावा असाच असला तरीही तो युक्तिवाद करू दिला जातोय हे गंभीर आहे. कामकाजाचे नियमन करण्याची सुप्रीम कोर्टाची काहीच जबाबदारी नाही का?, असा सवाल असीम सरोदे यांनी केला आहे.

“सुभाष देसाई (Subhash Desai) केसचा निकाल देताना तत्कालीन सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि दहाव्या सूचीनुसार आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेतला. त्यांच्या निकालात त्रुटी असल्यास सामन्यता हे प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवणं योग्य ठरेल.” हा युक्तिवाद कमालीचा हास्यास्पद आहे.

पुढे म्हणण्यात आले की, पण आता तत्कालीन विधानसभेची मुदतच संपली आहे. त्यामुळे अपात्रतेची मागणी निष्फळ. व्वा! सगळे मजेशीर सुरू आहे, अशी खिल्लीच सरोदे यांनी उडवली आहे. त्यासोबतच आता अंतिम निकाल नवीन वर्षातच येईल, अशीच शक्यता जास्त आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT