Eknath Shinde, Uddhav Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Operation Tiger : ठाकरेंचे फुटलेले खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले नाही, केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने मोठा खुलासा

Pratap Jadhav News : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटीबाबत कोणच अधिकृत वक्तव्य करीत नसल्याने ऑपरेशन टायगर पूर्ण झाले की नाही याबाबत चर्चा सुरु आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटीबाबत कोणच अधिकृत वक्तव्य करीत नसल्याने ऑपरेशन टायगर पूर्ण झाले की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. ठाकरेंच्या सेनेचे खासदार त्यांच्याकडून बजावलेल्या व्हीपनंतरही बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे एकीकडे 6 खासदार फुटीबाबत जोरात चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी या सहा खासदार फुटीबाबत मोठे विधान केले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोलकता येथे प्रसार माध्यमाशी बोलताना केंद्रीय मंत्री जाधव म्हणाले, ' ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह 6 खासदारांनी आता संसदेत एक वेगळा गट स्थापन केला आहे. त्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आमच्या पक्षात येणार असतील तर मनापासून स्वागतच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल हा थेट न्यायालयाने दिला आहे, त्यामुळे त्यावर आता कोणालाही बोलता येणार नाही. मात्र, ठाकरे यांच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी आता संसदेत एक वेगळा गट स्थापन केला असून लोकसभा अध्यक्षांनीही त्याला मान्यता दिली आहे. हे 6 खासदार आता स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. त्यांनी जर आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे मनापासून स्वागतच असेल, अशी खुली ऑफर केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भाष्य करताना प्रतापराव जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जी भावनिक भाषणे केली, त्यावरूनच 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याचा दावा स्वतः ठाकरे गटानेच सिद्ध केला आहे. त्यांच्या भाषणातील हतबलता आणि उद्वेग बरंच काही सांगून जातो, असेही जाधव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT