Uddhav Thackeray Eknath Shinde News
Uddhav Thackeray Eknath Shinde News  Sarkarnama
महाराष्ट्र

Thackeray Vs Shinde : शिवसेना ठाकरे की शिंदेंची? सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

सरकारनामा ब्यूरो

Shivsena News : मागील वर्षी जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदें (Eknath Shinde)सह ४० आमदारांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली.तेव्हापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे आहे. सत्तासंघर्षाचं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात मागील वर्षी जून महिन्यात दाखल झालं. त्यावेळेपासून एकही ठोस निर्णय़, आदेश न्यायालयाने दिलेला नाही. सातत्याने तारीख पे तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे. आज (दि.१४)सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेना(Shivsena) नेमकी कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

शिवसेनेतील उभ्या फूटीनंतर राज्यातील आघाडी सरकारवर कोसळले होते. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. तसेच उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोळा अपात्र आमदारांचा मुद्दा, शिवसेना पक्ष नाव, धनुष्यबाण चिन्ह यांच्यावरील दावा अशा विविध प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.यावर आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. याचवेळी उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)नी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय घ्यावा. तोपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेऊ नये अशी मागणी केला आहे. त्यामुळे आजची सुनावणी महत्वाची ठरणार आहे.

उध्दव ठाकरेंची ही विनंती मान्य झाली तर...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकऱण न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आहे. ते सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाकडून न्यायालयात करण्यात आली आहे. पण ठाकरेंची विनंती मान्य झाली आणि हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे गेलं तर निकालाला आणखी वेळ लागणार आहे. जर सध्याच्या घटनापीठाकडे राहिलं तर मग सलग सुनावणी होऊन लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे.

शिंदेंचा 'तो' दावा चुकीचा..

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या 30 जानेवारी रोजीच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखी युक्तिवादात एकनाथ शिंदे यांच्या बंडांची माहिती देण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडे असलेले मुख्य नेतेपद हे शिवसेनेच्या घटनाविरोधी असल्याचा युक्तिवाद करत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर ठोकलेला दावा चुकीचा असल्याचेही ठाकरे गटाने सांगितलं आहे.

शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी उत्तर दाखल

शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना आयोगात उत्तर दाखल केलं. तसेच शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाणावर दावा केला. यावेळी शिंदे यांचे मुख्य नेतेपद हे घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे अधिक आहे. निवडणूक चिन्ह देताना संख्याबळ विचारात घेतलं जावं असा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT