Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री यांनी दोन दिवसाचा दौरा करीत महायुतीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षाशी चर्चा केली. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये भाजप 150 ते 160 जागा लढविणार असल्याचे समजते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये भाजपने (Bjp) 150 ते 160 जागा लढाव्यात आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने उर्वरित जागा लढाव्यात असा फॉर्म्युला शहा यांनी सुचवला असल्याचे समजते. (Mahayuti News)
छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली. यामध्ये भाजपने 155 जागा लढाव्यात तर शिंदे गट व अजित पवार गटाने 133 जागा लढाव्यात, असे ठरले असल्याचे समजते. सध्यस्थितीत शिंदे गट व अजित पवार गटाचे 94 आमदार आहेत. त्यामुळे उर्वरित 39 जागांची वाटणी कशी करणार? याची उत्सुकता लागली आहे.
येत्या काळात 150 ते 160 जागा भाजपने लढाव्यात आणि उर्वरित जागा आपसात कशा प्रकारे वाटून घ्यायच्या याचा निर्णय शिंदे व अजित पवार यांनी फडणवीस यांना सोबत घेऊन घ्यायचा आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा जागा कमी लढणार नाही, असे या बैठकीत भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रमुख पक्षापैकी कोणी किती जागा लढणार हे ठरले नाही. संभाव्य मतदारसंघ निवडताना निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराची पडताळणी केली जात आहे.
39 जागांची वाटणी कशी होणार?
भाजपने 155 लढवल्या तर एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाकडे 133 जागा राहतील. भाजप 155 पेक्षा जितक्या कमी जागा लढेल तितक्या जास्त जागा मित्र पक्षाला मिळणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे स्वतःचे चाळीस आमदार व दहा अपक्ष आमदार असे एकूण पन्नास आमदार आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडील 41 तर काँग्रेसचे तीन आमदार मिळून सध्या 44 आमदार आहेत. शिंदेगट व पवार गट मिळून संख्या 94 इतकी होते.
त्यामुळे आता उरलेल्या 39 जागांची वाटणी शिंदे सेना व अजित पवार गटाला कशापद्धतीने करण्यात येणार याची उत्सुकता लागली आहे. महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला हा अजून ठरलेला नाही. त्यामुळे अंतिम फॉर्म्युल्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.