Raj Thackeray1 Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut Vs Raj Thackeray : 'मोदी आणि शाह यांची चाटूगिरी बंद करा'; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

ShivSena MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहिरातीवर आणि उद्याच्या पॉडकास्टवर टीका केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

"जर खरोखर या राज्यातील नेत्यांना सुसंस्कृत राज्य परत बनवायचे असेल, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची चाटूगिरी बंद केली पाहिजे", अस खणखणीत टोला राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. संजय राऊत यांनी ही टीका करून शिवसेना दसरा मेळाव्यापूर्वी मनसेला एकप्रकारे अंगावर घेतलं आहे. या टीकेचे काय पडसाद उमटतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी विविध मुद्यांवर संवाद साधला. महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीकास्त्र सोडले. 'मिस्टर फोर्टी परसेंट आहेत, हे सगळे!', असा निशाणा साधला. महायुती सरकारला भ्रष्टाचाराबाबत खादाड सरकार म्हणत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कमिशनचे परसेंट सांगितले. यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज विविध वृत्तांतून केलेल्या जाहिरातबाजीवर टीका केली.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, "सुसंस्कृत प्रगत महाराष्ट्र कोणाला घडवायचा असेल, तर सर्वात अगोदर महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार, भ्रष्टाचाराच्या बाबतीमधील, सैतानी सरकारचे गोडवे गाणं बंद केले पाहिजे. जर खरोखर या राज्यातील नेत्यांना सुसंस्कृत राज्य परत बनवायचे असेल, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची चाटूगिरी बंद केली पाहिजे". महाराष्ट्रातील सध्याचे नेते दिल्लीतील नेत्यांची चाटूगिरी बंद करतील, आणि ठामपणे उभे राहतील, त्यानंतर महाराष्ट्र पुन्हा संस्कारी, सुसंस्कारी, संयमी, वैभवशाली बनायला सुरवात होईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

'मनसे'ची काय आहे, जाहिरात?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज विविध वृत्तपत्रांमधून जाहिरात केली आहे. 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, चला, पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारुया! मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा..', असा मजकूर लिहून त्याखाली राज ठाकरे यांचे हात जोडलेले छायाचित्र आहे. यातच राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून उद्या महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होत असतानाच, निवडणुकीच्या तोंडावर 'पॉडकास्'टच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेसमोर आपलं मत मांडणार आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. यामुळे ठाकरे, शिंदे यांच्यासोबत 'राज'वाणीचा आवाजही घुमणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT