NCP leader Sunil Tatkare’s son Aniket Tatkare is likely to get a clear path for the Raigad MLC Election after the Shiv Sena-NCP agreement over the seat-sharing formula. Sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare : लेकाला आमदारकी मिळाल्यानंतर सुनील तटकरेंची पलटी? पालकमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य

NCP Raigad Guardian Minister: सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर सुनील तटकरेंनी रायगड पालकमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Roshan More

Sunil Tatkare News: रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतल्याने अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय पक्का झाला. शिंदेंची शिवसेना या जागेसाठी आग्रही होती. मात्र, सुनील तटकरेंना ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश आले.

रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेला देण्याच्या बदल्यात ही आमदारकी तटकरेंना मिळाल्याची चर्चा होती. कारण भरत गोगावले यांचे पुत्र आणि महेंद्र दळवी यांची मुलगी या जागेसाठी इच्छुक होते. जुईली दळवी यांनी उमेदवारी देखील दाखल केली होती. मात्र, नंतर एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर ती मागे घेण्यात आली.

अनिकेत तटकरे हे बिनविरोध आमदार झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पालकमंत्रिपदाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही बसून समन्वयाने यावर तोडगा काढू.

सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे पालकमंत्रिपद शिवसेनेला देण्याबाबत वक्तव्य न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्रिपदावर दावा कायम असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अनिकेत तटकरे यांचा विजय आपण अजितदादांना समर्पित करत असल्याचे त्यांनी म्हटले.

गोगावले काय म्हणाले?

पालकमंत्रिपदासाठी आग्रही असणाऱ्या भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,'अडीच वर्षांचे मंत्रिपद सोडलं होतं. त्यापुढे पालकमंत्रीपद काय चिज आहे. बोलायला कोणी काही बोलू शकतो, पण वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवायला पाहिजे ना. वरिष्ठ जेव्हा विचार करून सांगतात तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी ऐकणं गरजेचं आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT