Sunetra Pawar : मुलाची बिनविरोध निवड होताच तटकरे देवगिरीवर; अजितदादांच्या फोटोसमोर उभं राहिलेला फोटो ट्विट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, "विश्वासाला..."

Sunetra Pawar On Aniket Tatkare Elected Unopposed : भाजप मंत्री नितेश राणेंच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतल्यामुळे कोकण विधान परिषदेतून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली.
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Jun : विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी अनेक उमेदवारांनी काल (5 मे) आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. अर्ज माघारीमुळे पाच विधानपरिषद मतदाररसंघात आता बिनविरोध निवडणूक होणार आहे.

तर उरलेल्या काही ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध मविआ आणि काही ठिकाणी बंडखोर अशी लढत पाहायला मिळणार आहे. ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपुरात या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे.

तर याच बिनविरोध उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंचिव अनिकेत तटकरे यांचा समावेश आहे. भाजप मंत्री नितेश राणेंच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतल्यामुळे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेतून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली.

Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Gokul Politics : महायुतीला कोर्टात तोंडावर पडण्याची भीती अन् रात्रीत फिरला गेम : गोकुळमधील ४२७ अपात्र संस्थेतील २७० संस्था पुन्हा पात्र

याच बिनविरोध निवडीनंतर सुनील तटकरेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीची माहिती खुद्द सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, 'कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी देवगिरी या निवासस्थानी माझी सदिच्छा भेट घेतली.

Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Rajya Sabha Election : काँग्रेसकडून ७ राज्यसभा जागांवर उमेदवारांची घोषणा; 'या' खासदारांना दिली पुन्हा संधी

यावेळी अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन करत त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.' अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी अनिकेत तटकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, बाळ माने यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com