Nagaradhyaksha Election : कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीने उधळला गुलाल; सुनील तटकरेंच्या मास्टरस्ट्रोकने फिरला गेम

Mhasla Nagar Panchayat Nagaradhyaksha Election : म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा कोकणातील राजकीय वातावरण तापले. मात्र अंतिम क्षणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकी मास्टर स्ट्रोक मारत बाजी पलटली आहे.
Mhasla Nagar Panchayat Nagaradhyaksha Election; bharat gogawale and sunil tatkare
Mhasla Nagar Panchayat Nagaradhyaksha Election; bharat gogawale and sunil tatkaresarkarnama
Published on
Updated on

Raigad Mhasla Nagar Panchayat Election News : रायगडात सध्या विधान परिषदेच्या कोकण जागेवरून राजकीय रणकंदन सुरू झाले असून पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या सुपूत्रासाठी राजकीय ताकद पणाला लावत आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंसाठी आग्रही आहेत. यात काहीच चुकीचे नाही असे म्हणत गोगावले देखील या मागणीला आपला पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेनेला बसलेल्या हादऱ्यामुळे राष्ट्रवादीने विजयाकडे एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे.

म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत याआधीच मोठ्या उलथापालथी पाहायला मिळाल्या असून गोगावले आणि तटकरे यांच्यात काटशहाचे राजकारणाचे देखील दर्शन झाले आहे. गोगावले यांनी राष्ट्रवादी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश घडवून राष्ट्रवादीची असणारी सत्ता उलथवून टाकत भगवा फडकवला होता. मात्र चारच दिवसाच शाहिद जंजिरकर यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामागे सुनील तटकरे यांनी वरिष्ठ पातळीवर हलवलेले सूत्रे असल्याचे बोलले जात आहे.

यानंतर येथे रिक्त झालेल्या या पदासाठी पुन्हा निवडणूक जाहीर झाली. तर १ जून रोजी मतदान आणि निकाल होणार होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. मात्र अंतिम क्षणी शिवसेना शहराध्यक्ष सुफियान हळदे यांनी अर्ज दाखल करत सगळ्यांच धक्का दिला. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले. म्हसळा नगरपंचायतीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट राजकीय संघर्ष निर्माण झाला.

Mhasla Nagar Panchayat Nagaradhyaksha Election; bharat gogawale and sunil tatkare
MLC Elections 2026 : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप फिक्स? भाजपला सर्वाधिक जागा, तर शिंदेसेना अन् राष्ट्रवादीच्या वाट्याला किती?

सुफियान हळदे यांना काँग्रेसचे डॉ. मोईज शेख तसेच काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची बनली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे हे अनुभवी उमेदवार मानले जात असून त्यांना पक्षातील एकसंध पाठिंबा असल्याचा दावा केला जात होता. पण हळदे यांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतला.

सुफियान हळदे यांनी उमेदवारी अर्ज मार्ग घेतल्याने शेडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीने जल्लोष केला असून शिवसेनेच्या गोटात मात्र सन्नाटा पसरला आहे. तर या मागे तटकरे यांची खेळी असल्याची चर्चा आहे. या लढतीमुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून शिवसेनेतून नगराध्यक्ष राहिलेले शाहिद जंजिरकर शेडगे यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते. यामुळे देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या म्हसळा नगरपंचायतीत १६ नगरसेवक असून शिवसेनेकडे १० नगरसेवकांचे बळ असून राष्ट्रवादीकडे ६ नगरसेवक असल्याची स्थिती आहे.

गोगावलेंचा आदेश

दरम्यान नगरपंचायतीच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष निर्माण झाला असतानाच कोणत्याही स्थितीत माघार घ्यायची नाही, असा निर्धार शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र गोगावले यांच्या आदेशामुळे सुफियान हळदे यांना संख्याबळ असतानाही माघार घ्यावी लागली. यामुळेच राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाल्याचेही आता कुजबुज सुरू झाली आहे.

Mhasla Nagar Panchayat Nagaradhyaksha Election; bharat gogawale and sunil tatkare
MLC BJP Candidate : भाजपात मोठ्या घडामोडी, विधान परिषदेची 'या' महिला नेत्याला उमेदवारी, देवेंद्र फडणवीसांकडून हिरवा कंदील!

गोगावलेंवर नाराजी

एकीकडे नगरपंचायतीच्या राजकारणात सामान्य नगरसेवकांसह शिवसैनिकांनी तटकरे यांना अंगावर घेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आरपारची भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी तर तटकरेंना अंगावर घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. पण गोगावले यांच्या भूमिकेमुळे आता या सर्वांची चांगलीच नाचक्की झाली आहे. यामुळे गोगावलेंवर शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचेही आता चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com