Uddhav Thackeray Ekanth Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena Symbol Case : न्यायाधीशांच्या 'त्या' वक्तव्याने एकनाथ शिंदेंची धडधड वाढली; ठाकरेंच्या शिलेदाराने निशाणा साधला; म्हणाले,'योग्य ठिकाणी धनुष्यबाण...'

Supreme Court Shiv Sena hearing News : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरु आहे. सुनावणीवेळी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांनी महत्त्वाचे विधान केले.

Sachin Waghmare

Mumbai News : सुप्रीम कोर्टात गेल्या महिनाभरापासून सेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरु आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील नीरज कौल सुप्रिम कोर्टात बाजू मांडत आहेत. या सुनावणीवेळी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांनी महत्त्वाचे विधान केले. ज्यांनी घटनात्मक पाप केले त्यांच्यासाठी पक्ष चिन्हाचे महत्त्व लागू होईल की ज्यांनी त्या घटनात्मक पापाविरोधात तक्रारी केली त्यांच्यासाठी? असा सवाल जॉयमाल्या बागची यांनी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना केला होता. त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची धडधड वाढली असतानाच बुधवारी उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने निशाणा साधला आहे.

सुप्रीम कोर्टात मंगळवारी न्यायामूर्ती बागची यांनी केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी अनेक निरीक्षणं नोंदवले आहेत. त्यासोबतच शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील नीरज कौल यांना धारेवर धरले आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. बागची यांनी केलेली टिप्पणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे धनुष्यबाण योग्य ठिकाणी जाईल, अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण कुणाचे? यावर अत्यंत योग्य दिशेने सुनावणी सुरू आहे. त्यामुळेच योग्य ठिकाणी धनुष्यबाण दिला जाईल आणि पारदर्शक निकाल लागेल, अशी आम्हाला आशा आहे. न्यायामूर्ती बागची यांनी केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. त्यांनी अनेक निरीक्षणं नोंदवले आहेत. फुटीरांना चिन्ह कसं देऊ शकता? पक्ष कसा देऊ शकता? तक्रारदाराची बाजू ऐकायची की घटनेशी द्रोह करणाऱ्यांची बाजू ऐकायची? आमची तक्रार ऐकायची नाही. ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्या चोराला घटनात्मक संरक्षण द्यायचं. यावर बागची यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.

त्यासोबतच गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी मुंबईत पोहोचले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आंदोलनातून मार्ग काढला पाहिजे, असेही यावेळी राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT