BJP Vs Shivsena : महापौरांच्या पतीला भेटेल तिथे फटके देणार, भाजप पदाधिकाऱ्यांच्या धमकीने तणाव; युती तुटली, संघर्ष चिघळला!

Kamlesh Nikam Ulhasnagar : शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा भाजपने केल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
Kamlesh Nikam BJP threat in Ulhasnagar
Kamlesh Nikam BJP threat in Ulhasnagarsarkarnama
Published on: 
Updated on: 

नवनीत बऱ्हाटे

Ulhasnagar Politics : भाजप-शिवसेनेतील संघर्षाने उल्हासनगरचे राजकारण पेटले आहे. महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांना ‘भेटेल तिथे फटके देणार’, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मध्यरात्री त्यांच्या घराबाहेर जमाव जमला. शिवसेना पदाधिकारीही धावल्याने तणाव वाढला आणि पोलिसांना सुरक्षेसाठी घटनास्थळी तातडीने धाव घ्यावी लागली.

भाजपने शनिवारी शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कमलेश निकम, पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेनेची भूमिका मांडताना महापौरांचे पती कमलेश निकम यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मंचेकर टोळीशी संबंध असल्याचा वादग्रस्त आरोप केला.

कमलेश निकम यांच्या वक्तव्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये संताप उसळला. भाजपा पदाधिकारी कपिल अडसूळ आणि मनीष हिंगोरानी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून त्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. यावेळी निकम यांना ‘भेटेल तिथे फटके देणार’, अशी धमकीही देण्यात आली.

Kamlesh Nikam BJP threat in Ulhasnagar
Ulhasnagar News : महासभेत आक्षेपार्ह वक्तव्य, खुर्चीवर कब्जा अन् हाणामारी; ६५ लाखांचा गुवाहाटी अभ्यास दौरा ठरला निष्फळ!

संघर्ष अधिक तीव्र

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मध्यरात्री काही अज्ञात व्यक्ती निकम यांच्या निवासस्थानाजवळ जमा झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने घराबाहेर पोहोचले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली. मात्र, जमलेल्या अज्ञात व्यक्तींची ओळख अथवा त्यांचा उद्देश स्पष्ट झालेला नाही. या घटनाक्रमामुळे दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, उल्हासनगरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. युती तुटल्यानंतर सुरू झालेल्या शाब्दिक संघर्षाला धमकीमुळे गंभीर वळण मिळाले असून, राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

Kamlesh Nikam BJP threat in Ulhasnagar
Ulhasnagar Clash : महापालिकेतील युतीला सुरूंग, भाजप सत्तेतून बाहेर पडणार; भाजप आमदाराच्या घोषणेनं खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com