Devendra Fadnavis Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena News : उद्धव ठाकरेंचा पहिला फुटीर खासदार CM फडणवीस यांच्या भेटीला : ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिलेला शिवसेना नेताही सोबत

Varsha bungalow meet news : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाच ऑपरेशन टायगरची जबाबदारी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने सोमवारी रात्री उशीरा सीएम फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारानी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आठवडाभरापूर्वीच प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे करीत आहेत. तर दुसरीकडे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाच ऑपरेशन टायगरची जबाबदारी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने सोमवारी रात्री उशीरा सीएम फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे 'वर्षा'वर या भेटीदरम्यान काय घडले याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंड करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या 6 खासदारांच्या पक्ष प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे खासदारांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता केंद्रात दोन जणांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा रंगली असतानाच सोमवारी रात्री उशीरा सीएम फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी ऑपरेशन टायगरची जबाबदारी असलेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या सॊबत धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

यावेळी सीएम फडणवीसांसोबत तानाजी सावंत, धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या खासदारांनी जेव्हा बंडखोरी केली होती, त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका तळ्यातमळ्यात होती. मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले होते.

त्यातच पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणी कोर्टाचा निर्णय आला होता. त्याचवेळी दुसरीकडे ओम राजेनिंबाळकर यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिले होते. त्यामुळे ओम राजेनिंबाळकर यांच्या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगर संकटात सापडले होते, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरची जबाबदारी तानाजी सावंत यांच्यावर सोपवली होती. त्यावेळी तानाजी सावंत यांनी ओम राजेनिंबाळकर यांचे मन वळवण्यात यश आले होते. त्यानंतर ओम राजेनिंबाळकर यांनी धाराशिवमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत आणि ओम राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत वकील निलेश देशमुख हे देखील वर्षावर दाखल झाले होते. त्यामुळे या भेटीदरम्यान नेमके काय ठरले याची उत्सुकता रंगली आहे. दुसरीकडे तानाजी सावंत यांनी खासदारांच्या बंडामागे नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीने आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT