Pune News : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नावर त्यांनी थेट भाष्य केले. त्यामुळे सर्वच प्रश्नांची उत्तरे तर यावेळी मिळाली. त्यासोबतच यावेळी त्यांनी शिक्षकांचे पगार झाले नाहीत, असे एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी या प्रश्नाचे उत्तर न देता त्वरित पत्रकार परिषदेतून अर्थ विभागाच्या सचिवांना फोन लावला.
यावेळी त्यांच्याकडे शिक्षकाचा पगार का झाला नाही? याची फोनवरूनच चौकशी केली. त्यावेळी यासंदर्भात खातरजमा करताना अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी पगाराचा निधी दिला गेल्याचे सांगितले. पगाराचे सर्व पैसे संबंधित विभागाला दिले आहेत. त्या विभागातून अडचणी असल्याचे त्यांनी स्प्ष्ट केले. यावेळी अजित पवार यांनी फोन करून चौकशी केल्याने त्यांच्या या कार्यशैलीचे कौतूक केले जात आहे.
राज्यातील शिक्षकांचा पगार रखडला असल्याचा बातम्या आल्या आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात गुरुवारी पुण्यात राज्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारण्यात आला. महिन्याला मिळणारा पगार हा नाजूक विषय असल्यामुळे त्याची गंभीर दखल अजितदादांनी थेट घेतली. काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे पगार वेळेवर झाले पाहिजे. जर पगार झाले नसतील तर ताबडतोब कसे होतील, त्यासंदर्भात पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना शिक्षकांचा पगार झाला नसल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी थेट अर्थविभागातील अधिकाऱ्यांना फोन लावला. त्यांना शिक्षकांचा पगाराचा निधी दिला गेला की नाही? यासंदर्भात विचारणा केली. अधिकाऱ्यांनी निधी दिला गेला असल्याचे उत्तर दिले.
पगाराचे सर्व पैसे संबंधित विभागाला दिले आहेत. आता कुठे पगार झाले नाही त्या त्या विभागात पगार देत असताना काही त्रूटी किंवा काही अंतर्गत प्रश्न असले तर पगार रखडले असतील. परंतु आता यावर शिक्षण सचिवांशी बोलतो. कोणाचाही पगार राहता कामा नये, असे स्पष्टपणे सांगतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजितदादांनी अर्थ विभागाकडून पैसे दिले गेल्याचे समजल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अजितदादांची ही कार्यशैली नोकरदार वर्गाला आवडली. त्यासोबतच येत्या काळात शिक्षण सचिवांशी बोलून कोणाचाही पगार राहता कामा नये, असे स्पष्टपणे सांगतो, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिल्याने शिक्षकांचा रखडलेला पगार लवकर होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.