Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने महायुतीमध्ये जोरात इनकमिंग सुरु आहे. त्यातच आता महायुतीमधील मित्रपक्षातील नेत्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जात असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. अशास्वरूपाच्या पक्ष प्रवेशावरून आता महायुतीमध्येच धुसफूस पाहवयास मिळत आहे. युतीधर्म तोडल्याने एकसंधता धोक्यात येत असल्याचा आरोप करीत एकनाथ शिंदेंच्या आमदाराने थेट भाजपलाच इशारा दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्षातच अंबरनाथमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेतील वातावरण चांगलेच तापले आहे.
अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2015 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यादव, हे त्या नंतर शिवसेनेत सहभागी झाले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश घेतला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरेंद्र यादव यांना पक्षात घेत युतीधर्माचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात यापूर्वी ठरले होते की, युतीतील एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या पक्षात घेणार नाही. मात्र भाजपने हा करार मोडला आहे. जर भाजप युतीधर्माचे पालन करणार नसेल, तर आमच्याकडेही भाजपच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी तयार आहे, असा सूचक इशारा किंकर यांनी भाजपला दिला आहे.
आमदार बालाजी किणीकर यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे अंबरनाथमधील युतीची एकसंधता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर जागा वाटपापासून ते आगामी निवडणूक रणनीतीपर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपकडून यावर काय भूमिका घेतली जाईल? महायुतीमधील समन्वयासाठी पुढे कोणते पावले उचलली जातील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.