Pratap Sarnaik Auto Rickshaw Permits  sarkarnama
महाराष्ट्र

Pratap Sarnaik News: मंंत्री प्रताप सरनाईकांनी पुन्हा अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना ठणकावलं; म्हणाले,'16 ऑगस्टनंतर...'

Mahayuti Government: महायुती सरकारनं राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मेपासून मराठी भाषा येणं सक्ती करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देताना नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेशही दिले होते.

Deepak Kulkarni

Mumbai News : महायुती सरकारनं राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मेपासून मराठी भाषा येणं सक्ती करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देताना नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेशही दिले होते.

मात्र, राज्य सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला परप्रांतिय रिक्षा व टॅक्सी चालकांकडून तीव्र विरोध करण्यात आला. तसेच 4 मे रोजी संपही पुकारण्यात आला होता. यानंतर सरकारने थोडी नरमाईची भूमिका घेत 1 मे रोजी ते 15 ऑगस्ट असा 100 दिवसांचा कालावधी रिक्षा अन् टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली होती. आता याप्रकऱणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी(ता.22)अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषा शिकण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. ते म्हणाले, अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी येत्या 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकणं सक्तीचं असणार आहे. सरकारकडून 16 ऑगस्टनंतर संबंधित अमराठी रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याची ठाम भूमिका मांडली आहे.

राज्य सरकारच्या मराठी सक्तीच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर आरटीओकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा गर्भित इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे आता अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना कोणत्याही परिस्थितीत मराठी शिकणं अनिवार्य असणार आहे.

परिवहन मंत्र्यांनी राज्यात ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं रिक्षा किंवा टॅक्सी चालत असतील, तर त्यांचे परवाना रद्दची कारवाई सुरू राहणार असल्याचंही जाहीर केलं आहे.तसेच कितीही दबाव टाकला, कितीही बंदचे हत्यार उपसले, तरी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असला, तर मराठी शिकावीच लागेल, असेही मंत्री सरनाईक यांनी ठणकावून सांगितलं आहे.

मराठी भाषा शिकायची तयारी असलेल्या सर्व अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना संबंधित आरटीओ कार्यालयात जागा तयार करून देण्यात आली आहे. आरटीओचे अधिकारी 1 मे रोजी ते 15 ऑगस्ट दरम्यान रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार आहेत. इतकेच नाही,तर रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक पुस्तिकाही काढण्यात आली आहे. पण यापुढे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, तर मराठी अनिवार्य असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT