Tukaram Mundhe Narhari Zirwal  sarkarnama
महाराष्ट्र

IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली होणार? अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांची सभागृहात मोठी माहिती

Maharashtra FDA News : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्विकारल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या राज्यभरात सुरू असलेल्या बेधडक कारवायांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Deepak Kulkarni

Mumbai News : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्विकारल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या राज्यभरात सुरू असलेल्या बेधडक कारवायांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिवसागणिक वाढत्या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत. याचदरम्यान, आता तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा जोरदारपणे सुरू झाली.यावर आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठं विधान केलं आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज कारवायांइतकेच वारंवार होत असलेल्या त्यांच्या बदल्यांमुळेही चर्चेत आहेत.त्यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही 24 वी बदली आहे. आता एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यापासून मुंढेंनी पुन्हा एकदा आपल्या कारवायांचा दणका देणं सुरू केलं आहे.

याचदरम्यान, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॅाबीकडून 250 कोटी रुपये गोळा केल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत दिली. त्यांनी यावेळी मुंढेंची विकेट काढायला 250 कोटी रुपये जमा केले जात असल्याचा दावा केला आहे.

विधानसभेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले, एफडीएकडून चांगली कारवाई सध्या सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही. अधिकाऱ्यांकडे चांगली वाहने नाहीत. कार्यालय नाहीत. अत्यंत दयनीय अवस्था आहे. अधिकाऱ्यांसाठी चांगल्या वाहनांची व्यवस्था केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

याचवेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चांवर रोखठोक विधान केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्यातील टी हा टायगरमधील टी झाला आहे. ते चांगले काम करतायत, तर त्यांना तीन वर्षे ठेवले पाहिजे असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेच्या सभागृहात तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी जोरदार मागणी खोतकर यांनी केली आहे.

मंगळवारी(ता.23) आयएएस अधिकारी व एफडीएचे आयु्क्त तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेली एका महत्त्वाची जबाबदारी काढून घेतल्यामुळे त्यांच्या बदलीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंढे हे यापूर्वी मंत्रालयात सचिव असताना त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारीदेण्यात आली होती. ती आता काढून घेण्यात आली आहे.

आता परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यावर आता परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. मात्र, त्यांची अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत टाकलेल्या नव्या बॉम्बमुळे प्रशासन हादरलं आहे. ते म्हणाले, तुकाराम मुंढे यांची मोठी सुपारी घेण्यात आली आहे. 250 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ड्रग्ज लॉबी, मेडिकल कंपन्या अशा अनेक एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. पुढच्या आठवड्यात मी नावानिशी सगळं समोर आणणार असल्याचे आव्हाड म्हणाले.

अन्न व प्रशासन विभाग झिरवळ चालवत नसून ते आणखी कोणीतरी चालवत आहेत असाही आरोप आव्हाडांनी केला. यावेळी त्यांनी अधिकारी त्याच त्या ठिकाणी आहेत. अधिकाऱ्यांची देखील लॉबी आहे, पालघरला गुटखा उतरला की तो महाराष्ट्रात कसा फिरतो? अशी विचारणाही आव्हाडांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT