BJP News: आमदार फुटले,चुकीला माफी नाही..! विधान परिषदेतील पराभव भाजपच्या जिव्हारी; एका एका गद्दाराला शोधून हिशेब चुकता करणार

Karnataka MLC Election : गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसनं मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळवत भाजपचा धुव्वा उडवला. एनडीएची तब्बल 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानं काँग्रेसचा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाला.
 BJP
BJPsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं दणदणीत कामगिरी करताना महायुतीतील लढवलेल्या अकराच्या अकरा जागा जिंकल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीपासून ते नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपनं विरोधी पक्षांचा धुव्वा उडवताना उल्लेखनीय यश मिळवलं. मात्र, त्याच भाजपला कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर भाजप अॅक्शन मोडवर आले आहेत.

कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीत भाजपा आणि जेडीएस आघाडीच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं समोर आलं आहे. एकीकडे विरोधकांना क्रॉस व्होटिंगचा झटका बसत असताना आता भाजपलाही त्याचा धक्का बसला आहे. याच क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपा-जेडीएसच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसनं मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळवत भाजपचा धुव्वा उडवला. एनडीएची तब्बल 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानं काँग्रेसचा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीत भाजप आणि जेडीएसच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंगचा मोठा फटका बसला. या पराभवाची दखल दिल्लीतीन भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे.

कर्नाटक विधानपरिषदेतील पराभवानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंगळवारी(ता.23) कर्नाटकातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांबरोबर दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि कर्नाटक प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस राधा मोहन दास अग्रवाल हेही उपस्थित होते.

 BJP
Beed: बीडमध्ये बजरंग सोनवणेंना मोठा धक्का; विलास घुले हत्याप्रकरणात मुलाचा पाय खोलात : पोलिसांकडून पहिली अॅक्शन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आता कर्नाटकातील पक्षाच्या नेत्यांना या बैठकीत क्रॉस-व्होटिंगच्या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीतील क्रॉस व्होटिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल 25 जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कर्नाटक विधानसभेत एकूण 224 आमदारांपैकी काँग्रेसकडे 135 आमदार असूनही परिषद निवडणुकीत पक्षाला 151 मते मिळाली. दुसरीकडे- भाजपाचे 64 आमदार असूनही पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून केवळ 56 मते पडली. तर जेडीएसकडे 18 आमदार असूनही त्यांच्या उमेदवाराला केवळ 14 मते मिळाल्याचं समोर आलं आहे.

 BJP
Padmasinh Patil News : 20 वर्षानंतर निर्दोष सुटलेल्या पद्मसिंह पाटलांचा जाहीर सत्कार? राणाजगजितसिंह पाटलांनी खरं काय ते सांगितले...

राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतरची डी. के. शिवकुमार यांची ही पहिलीच परीक्षा होती. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख मिळविलेल्या शिवकुमार यांच्या आग्रहानंतरही पाचवा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली तरी शिवकुमार यांना आणि सरकारलाही धक्का बसेल, याचीही जाणीव त्यांना असणार. पण त्यांनी धाडस करत एनडीएविरोधात उमेदवार दिला.

या निवडणुकीत डी के शिवकुमार यांनी एकप्रकारे भाजपचेही आमदार फुटू शकतात, हे एकप्रकारे शिवकुमार यांनी दाखवून दिल्याची चर्चा आहे. पक्षानेही याची गंभीरपणे दखल घेतली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडीयुरप्पा यांनी चार ते पाच आमदार फुटल्याचे मान्य केलं आहे.

 BJP
Padmasinh Patil News : 20 वर्षानंतर निर्दोष सुटलेल्या पद्मसिंह पाटलांचा जाहीर सत्कार? राणाजगजितसिंह पाटलांनी खरं काय ते सांगितले...

त्यांनी राज्यातील आमदारांच्या फुटीचा रिपोर्ट पुढील एक-दोन दिवसांत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना देणार असल्याचं संकेत दिले आहेत. त्यानंतर संबंधित आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. पण शिवकुमार यांनी मात्र भाजपला झटका देत आगामी निवडणुकीआधी सूचक इशाराही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com