Uddhav Thackeray Announces Ramraksha Andolan sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : तातडीची पत्रकार परिषद, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय,'भाजप विरोधात...'

Uddhav Thackeray Announces Ramraksha Andolan : अयोध्येतील राम मंदिरात मोठ्या प्रमाणात दान केलेले पैसे लुटल्याचे समोर आले आहे. त्या विरोधात ठाकरेंनी आंदोलनाची घोषणा करत भाजपला इशारा दिला आहे.

Roshan More

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद बोलवली होती. त्यामुळे ते नेमके काय बोलणार याची उत्सुकता होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजप विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.

अयोध्येतील राम मंदिरात मोठ्या प्रमाणात दान केलेले पैसे लुटल्याचे समोर आले आहे. त्या विरोधात ठाकरे आक्रमक झाले. ते म्हणाले, "९० च्या दशकात वाजपेयी म्हणाले होते की 'अब हिंदू मार नहीं खायेगा', तसेच आज मी म्हणतोय की 'अब हिंदू माफ नहीं करेगा'. जे जे देव आणि मंदिरे लुटतायत मग ते भाजपचे असोत वा इतर कोणी त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही."

या विरोधाची रविवारी (५ जुलैला) संध्याकाळी ४ वाजता दादर येथील जुन्या कबुतरखान्याजवळील मारुती मंदिरासमोरून होणार 'रामरक्षा' आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

पक्षभेद विसरून सर्व रामभक्तांना, हिंदूंना आणि ज्यांनी हिंदुत्व धोक्यात आल्यामुळे मोर्चे काढले होते, त्या सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. ते स्वतः आणि शिवसेनेचे इतर नेते, लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित राहणार आहेत.

'रामरक्षा' आंदोलनाचे स्वरूप

या आंदोलनाला 'रामरक्षा आंदोलन' असे नाव देण्यात आले आहे. हिंदू व रामभक्तांना जागे करण्यासाठी आणि भाजपला जाब विचारण्यासाठी या आंदोलनात सामूहिकरीत्या रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसा यांचे जाहीर पठण केले जाईल.

राज्यव्यापी मोहिमेची

रविवारी दादरमधून होणारी ही सुरुवात असून, त्यानंतर राज्यभरात जिल्हा पातळीवर, शहरात आणि खेड्यापाड्यात जिथे जिथे राम किंवा हनुमान मंदिरे आहेत, तिथे हे आंदोलन केले जाईल. सध्या आषाढी वारी सुरू होत असल्याने, राम मंदिराच्या लुटीविरोधात मनात राग असणाऱ्या वारकऱ्यांनीही यात एकत्र यावे आणि भाजपला याचे उत्तरदायित्व स्वीकारायला लावावे, असे आवाहन ठाकरेंनी केले आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली होत असलेली ही लूट सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT