Uddhav Thackeray News Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : मी लाचारी, गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shivsena Politics : राज्यातील या गळती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन सुरू आहे. यानंतर ते सत्तेत येणार नाहीत. मी कधीच लाचारी पत्करणार नाही.

Sachin Waghmare

Chhatrapti Sambhajinagar News : आगामी काळात होत असलेली विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. मी लाचारी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लागू देणार नसल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुतीच्या कारभारावर हल्लाबोल केला.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महायुतीच्या (Mahayuti) सरकारवर सडकून टीका केली. (Uddhav Thackeray News)

राज्यातील या गळती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन सुरू आहे. यानंतर ते सत्तेत येणार नाहीत. मी कधीच लाचारी पत्करणार नाही. लाचारांचा महाराष्ट्र होऊ द्यायचे की नाही हे तुम्ही ठरवायचे आहे. मी कधीच लाचारी, गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील आघाडी सरकारचे पाप उघडे पडले आहे. ते झाकण्यासाठी आता राज्यात विविध योजनांचा पाऊस पडला जात आहे. मात्र, राज्यातील जनतेला त्यांचे खरे रूप कळले आहे. त्यामुळे कोण त्यांच्या पाठीशी उभे राहील असे वाटत नाही. त्यामुळे विविध आश्वासने दिली जात आहेत.

आमचे कुटुंब फोडले, शरद पवार (Sharad Pawar) यांचे कुटुंब फोडलं आता जनतेचं कुटुंब फोडायला निघालात असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातले उद्योग गुजरातले नेले आहेत. मोदी गॅरंटीला लोकांनी उलथून लावल्याचेही ठाकरे म्हणाले.

आम्ही केलेल्या कामाचे श्रेय हे सरकार घेत असल्याचेही ठाकरे म्हणाले. महिलासांठी योजना आणल्या त्याचे स्वागत केले. पण युवकांसाठी काय ? त्यांच्यासाठी रोजगार आहे का ? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT