Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT Candidate List : ठाकरेंचा मविआला मोठा धक्का; 'या' तिढा असलेल्या जागेवर जाहीर केले उमेदवार

MVA Internal Seat Conflict : विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी पहावयास मिळत आहे. या यादीत शिवसेना ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीत तिढा असलेल्या अनेक जागेवरील उमेदवार ठरविले असल्याने ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Sachin Waghmare

Mumbai Political News : विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी पहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असल्याने शिवसेना ठाकरे गटाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

या यादीत शिवसेना ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीत तिढा असलेल्या अनेक जागेवरील उमेदवार ठरविले असल्याने ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इतर पक्षातील व स्वपक्षातील अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून पहिल्या यादीमध्ये 15 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर शिवडी या एकमेव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर सस्पेन्स कायम आहे. येथे विद्यमान आमदार अजय चौधरी की सुधीर साळवी ? यांना उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागेचा निर्णय दुसऱ्या यादीमध्ये घेतला जाईल, त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने ज्या जागांवर तिढा होता, अशा अनेक जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये रामटेक- विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली तर नांदगावमधून गणेश धात्रक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे पंकज भुजबळ शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक होते तर सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने व धर्मराज काडादी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते.

सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली तर वांद्रे पूर्व मतदार संघातून आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू वरूण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कर्जत मतदारसंघातून नितीन सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करताना अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये काही जण इतर पक्षाकडून आलेली मंडळी देखील आहेत. त्यामध्ये वरूण सरदेसाई, महेश सावंत, प्रवीणा मोरजकर, केदार दिघे, स्नेहल जगताप, समीर देसाई, सिद्धार्थ खरात, राजू शिंदे या नवख्या उमेदवारांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT