Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पक्ष, चिन्ह गेल्यानंतर आता 'या' पदावरून हकालपट्टी?

Shivsena News : शिवसेना पक्ष व त्यानंतर धनुष्य बाण चिन्ह गेले. त्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. पक्षात पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद गेले. त्यानंतर त्यांच्या सोबतचे 40 आमदार व 13 खासदार गेले. त्यानंतर शिवसेना पक्ष व त्यानंतर धनुष्य बाण चिन्ह गेले. त्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता असून आता या मोठ्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सोमवारी रंगशारदा सभागृहात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात सोमवारी (ता.13) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हकालपट्टी करावी, असा ठराव शिवसेनेच्या या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

हा ठराव घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची विनंती करण्यात येणार आहे. शिवसेनेचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकताच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामकाज कुठपर्यंत झाले हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena)आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन केल आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन म्हणून उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, असा ठराव आम्ही या बैठकीत मंजूर केला आहे, अशी माहिती या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT