Mumbai News : भाजपकडून गेल्या काही दिवसापासून देशात 'वन नेशन, वन इलेक्शन' राबविण्याची घोषणा केली जात आहे. त्याला धरूनच हिमंत असेल तर उद्याच देशभरातील निवडणूक जाहीर करा, निवडणुका घेतल्यानंतरच तुम्हाला नेशन काय असते ते कळेल, असा इशारा ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून पीएम नरेंद्र मोदींना दिला.
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात रविवारी उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. आता ही आग सरकार बदलेपर्यंत सुरूच राहणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करायला आलो नाही तर तुमच्यासोबत लढ्याला आलो आहे. केंद्रातील सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगत राहिली पाहिजे, असा इशारा देत येत्या काळात हा लढा व्यापक करण्याची घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली.
या सरकारने तुमचे भविष्य चोरले आहे. सोनम वांगचुकांना देशद्रोही ठरवले जात आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण सोडविण्यासाठी विलासराव देशमुख यांना पाठवले होते. मात्र, वांगचुकांचे उपोषण सोडविण्यासाठी सरकारकडून कोणीच आले नसल्याबद्दल सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
वांगचुकांसारखी माणसे पुन्हापुन्हा जन्माला येत नाहीत. दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकशी चर्चा करताय मात्र देशातील सैनिकांसाठी सोलार टेंट तयार करण्याचे काम करणाऱ्या वांगचुकांचे कार्य मोठे आहे. त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. उलटपक्षी त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. त्यामुळे आता मी देशभक्त ही मोहीम सुरु करून आपली ताकद दाखवून द्या, असेही त्यांनी सांगितले.
एकीकडे मुलगी शिकली प्रगती झाली असे म्हणता आणि दुसरीकडे पेपर फोडले जात आहेत. अभ्यास म्हणजे काय भाजपवाल्याला माहित नाही. धर्मेंद्र प्रधान यांना काय सोने लागले आहे का? सरकारने तुमचे भविष्य चोरले आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजनीमा क्षुल्लक आहे तर सरकार बदलेपर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.