

Mumbai News: एकीकडे शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. याचदरम्यान, ऑपरेशन टायगरच्या चर्चांनाही मोठं उधाण आलं होतं. त्याचदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानं एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. यामुळे त्यांचं दिल्लीसह महायुती सरकारचं वजन वाढल्याची चर्चा आहे.
आता एकनाथ शिंदेंच्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची चर्चा जोर धरू लागली आहे. कायदे अभ्यासक व वकील असीम सरोदे यांच्या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ‘भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे,असं सरोदे यांनी म्हटलं आहे.
तसेच खरी गंमत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा. राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग असल्याचा दावाही असीम सरोदे यांनी केला आहे.
वकील असीम सरोदे यांनी आपल्या ट्विटमध्ये फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय ?’ असं ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला ठाकरेंचे बंडखोर खासदार लागले आहेत. यामुळे शिवसेनेत आनंद तर भाजपच्या गोटात काहीशी अस्वस्थता पसरली आहे.दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादानेच शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नऊपैकी सहा खासदार फोडत ऑपरेशन टायगर यशस्वी केल्याचं बोललं जात आहेत.
शिंदेंची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जर फुटीर खासदार पक्षप्रवेश झाला,तर त्यांच्या पक्षाचं संख्याबळ 7 वरुन थेट 13 होणार आहे. महायुतीत शिवसेना सर्वाधिक खासदार असलेला पक्ष ठरणार आहे. ही खासदारांची ताकद शिंदे लोकसभेत भाजपच्या मागे उभी करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांना या मोठं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.
राज्यासह दिल्लीतीलही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढणार आहे. त्यामुळे शिंदे यांची पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करण्याची लपून न राहिलेली इच्छा आगामी काळात पूर्ण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे मोदी सरकारचे महत्वाकांक्षी लोकसभा-विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयक नव्यानं मांडून ते मंजूर करून घेण्यासाठी मोठी मदत होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.