Nilam Gorhe-Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena : "हे सगळे गए गुजरे लोकं" निलम गोऱ्हेंच्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर

Nilam Gorhe Vs Uddhav Thackeray : शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

Hrishikesh Nalagune

मुंबई : नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल महिला म्हणून आदर आहे. मात्र राजकीयदृष्ट्या ही सगळी गयी गुजरी लोक आहेत. त्यांनी राजकारणात त्यांचं चांगभल करून घेतलं आहे. त्यांना आतापर्यंत चार वेळा आमदार केले, उपसभापती केले. मग त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? असा सवाल करत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते काँग्रेस नेते किरण काळे यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा गंभीर आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. नवी दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला.

या आरोपांवर बोलताना ठाकरे म्हणाले, जाऊ द्या हो. ही सगळी राजकीयदृष्ट्या गयी गुजरी लोकं आहेत. एक महिला म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे. पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं करून घेतलं आहे. त्याचवेळी ठाकरे यांच्या शेजारी बसलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, माझा एक प्रश्न आहे त्यांना. त्यांना आतापर्यंत चार वेळा आमदार केले. उपसभापती केले. त्यांनी किती मर्सिडीज दिल्या?

गोऱ्हे यांनी आतापर्यंत आठ मर्सिडिज दिल्या का? त्यांनी त्याची काही कागदपत्रे असली तर ती आणून द्यावीत, असे आव्हानही खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी दिले. तर "ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी आहे"; असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गोऱ्हेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. "मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पण आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. पक्षाने माझ्याकडे कधीही पैसे मागितले नाहीत." असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT