Dharisheel Mohite Patil : शरद पवारांच्या खासदाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; केली ही मोठी मागणी....

Chhava Film : स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ‘छावा’ चित्रपटाची सध्या सगळीकडे धूम सुरू आहे. अगदी दिल्लीतील मराठा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
Dharisheel Mohite Patil-Narendra Modi
Dharisheel Mohite Patil-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 February : स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ‘छावा’ चित्रपटाची सध्या सगळीकडे धूम सुरू आहे. अगदी दिल्लीतील मराठा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून छावा चित्रपटासंदर्भात मोठी मागणी केली आहे. आता पंतप्रधान या पत्राला काय उत्तर देतात अथवा कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात नुकताच छावा चित्रपट (Chhava film) प्रदर्शित झाला आहे, त्या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मात्र, या चित्रपटासंबंधी वादही निर्माण झाला आहे. गणोजी शिर्के यांच्या वंशजाने चित्रपटातील काही कथानकावर आक्षेप घेतला आहे, त्यावरून वादही निर्माण झाला आहे.

दरम्यान, छावा चित्रपटासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dharisheel Mohite Patil ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मोठी मागणी केली आहे. हा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करण्याबरोबरच तो देशातील सर्व शाळांमध्ये मोफत दाखविण्यात यावा, अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

Dharisheel Mohite Patil-Narendra Modi
Manoj Jarange Patil : ‘इतक्या क्रूर माणसाला भेटायला जायची काय गरज होती?; धस हा विषय माझ्यासाठी संपलाय’

धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे एक महान योद्धा आणि कर्तव्यनिष्ठ राजा होते. त्यांचे बलिदान, स्वराज्यनिष्ठा आणि देशभक्ती ही तरुण पिढीला प्रेरण देणारी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शौर्य, बलिदान, सत्यनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठा दाखवण्यात आलेली आहे.

Dharisheel Mohite Patil-Narendra Modi
Kolhapur Guardian Minister: आधी मंत्रिपदाची हुलकावणी, आता शिंदेंच्या जवळच्या आमदाराचं कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठं विधान

छावा हा चित्रपट देशभरातील युवकांना साहस, इनामदारी आणि कर्तव्याबाबतची निष्ठा याची प्रेरणा देणारा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन केवळ ऐतिहासिक नाही तर प्रेरणादायी आहे, त्यामुळे छावा हा चित्रपट संपूर्ण देशभरातील शाळांमध्ये मोफत दाखविण्यात यावा. या चित्रपटाचे ऐतिहासिक महत्व लक्षात तो संपूर्ण देशभरात करमुक्त (टॅक्स फ्री) करण्यात यावा. हा चित्रपट करमुक्त केल्यास संपूर्ण देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. यावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com