Mumbai News : राज्यात वेगवान घडामोडी घडत असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि NEET पेपरफुटीच्या प्रश्नाकडे लक्ष घातले आहे. ठाकरे यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने केंद्रातील मोदी सरकारचे टेन्शन वाढणार आहे. NEET पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात आले. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत सोनम वांगचुक, अभिजित दिपकेंना फोन केला. या दोघांशी संवाद साधत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर येथे गुरुवारी NEET पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी दुपारी 1 वाजता आंदोलन करण्यात आले. शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि NEET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात आहे. या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारचे टेन्शन वाढले आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) थेट फोन करून संपर्क साधल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी झाले आहेत. त्यासोबतच पर्यावरणवादी प्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे होत असलेल्या या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिजत दिपके यांना फोन करीत त्यांच्याशी संवाद साधला. इतकेच नाही तर त्यांनी या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवला. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांनी आंदोलक सोनम वांगचूक यांच्याशीदेखील संवाद साधला. त्यांनी सोनम वांगचूक यांना तब्येतीची विचारणा करीत काळजी घ्या, असा सल्लादेखील त्यांना दिला.
यापूर्वीही नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी व अभिजित दिपके यांनी केलेल्या आंदोलन केले होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीही उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचे तोंडभरून कौतुक केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.