Maharashtra petrol diesel prices today Sarkarnama
महाराष्ट्र

Petrol Diesel Prices in Maharashtra : अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती कडाडल्या; काय आहेत आज राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर?

US Iran tensions impact on crude oil prices : अमेरिका-इराण तणाव वाढल्याने जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल-डिझेल दर आणि त्यावर होणारा परिणाम जाणून घ्या.

Rashmi Mane

Global crude oil prices impact on India fuel rates: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावाचे पडसाद आता जागतिक बाजारात उमटू लागले आहेत. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बुधवारी ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय (WTI) या प्रमुख तेल निर्देशांकांमध्ये सुमारे 6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे भारतात पेट्रोल- डिझेलचे दर लगेच कमी होतील अशी शक्यता कमी झाली आहे.

सध्या देशातील इंधनाचे दर स्थिर असले तरी जागतिक बाजारातील हालचालींवर तेल कंपन्यांचे बारकाईने लक्ष आहे. 25 'मे'पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

याआधी पेट्रोलमध्ये प्रति लिटर 2.61 रुपये आणि डिझेलमध्ये 2.71 रुपयांची वाढ करण्यात आली होती. राजधानी दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 85 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा थेट परिणाम देशाच्या आयात खर्चावर होतो. जर कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळ 80 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त राहिले, तर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

महाराष्ट्रातही इंधनाचे दर जिल्हानिहाय वेगवेगळे आहेत. मुंबईत पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल 111.85 रुपये तर डिझेल 98.50 रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 112.46 रुपये, नागपुरात 111.69 रुपये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 112.08 रुपये प्रति लिटर दर कायम आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT