Pune Police : बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीत पोलिसांनीच मांडला वसुलीचा धंदा? 'तोडपाणी' करणाऱ्या पोलिसांवर मोठी कारवाई!

Faraskhana Cops Suspended : शनिवार वाडा पाहून बुधवार पेठ परिसरात फिरणाऱ्या तरुणांना खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून, त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
Pune Police Extortion | Faraskhana Cops Suspended | Budhwar Peth
Pune Police Extortion | Faraskhana Cops Suspended | Budhwar PethSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 09 Jul : पुण्यातील मध्यवर्ती आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बुधवार पेठ परिसरात खाकी वर्दीला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेहमी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनीच थेट वसुली गँगसारखे कृत्य करत सर्वसामान्यांना लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

शनिवार वाडा पाहून बुधवार पेठ परिसरात फिरणाऱ्या तरुणांना खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून, त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी या संदर्भात कारवाईचे आदेश जारी केले आहेत. राहुल सुधाकर दाभाडे आणि विवेक शैलेश पाटील अशी या खंडणीखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गोष्ट अशी की, हडपसर भागात राहणारा २४ वर्षीय तक्रारदार तरुण एका हॉटेलमध्ये काम करतो. २९ जून रोजी तो आपल्या दोन मित्रांसह शनिवार वाडा पाहण्यासाठी आला होता. तिथून फिरत फिरत रात्री साडेअकराच्या सुमारास हे तिघे मित्र बुधवार पेठेतील एटीएम गल्ली आणि लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक परिसरातून पायी जात होते.

Pune Police Extortion | Faraskhana Cops Suspended | Budhwar Peth
Bombay High Court : म्हातारपणात आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना उच्च न्यायालयाचा मोठा दणका; आता थेट प्रॉपर्टीच परत घेतली जाणार

नेमकी याच वेळी तेथे नाकाबंदीचे कर्तव्य बजावत असलेले पोलीस शिपाई विवेक पाटील आणि राहुल दाभाडे दुचाकीवरून आले आणि त्यांनी या तरुणांना अडवले. आरोपी पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी केली.

तरुणांनी आपल्या मोबाईलमधील आधार कार्ड दाखवले तरीही या दोन्ही पोलिसांनी मुजोरी करत, 'तुमच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल होईल, तुम्हाला कोर्टात खेचावे लागेल' अशी थेट धमकी दिली.

अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे तरुण प्रचंड घाबरले. याचाच गैरफायदा घेत कारवाई न करण्यासाठी पोलिसांनी थेट प्रत्येकी पाच हजार रुपयांनुसार एकूण १५ हजार रुपयांच्या तोडपाणीची मागणी केली. भयभीत झालेल्या तरुणांनी आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगत गयावया केली.

शेवटी मित्राकडून ऑनलाईन मागवून देतो असे सांगितल्यानंतर, या पोलिसांनी एका तरुणाला दुचाकीवर बसवून बुधवार पेठेत नेले आणि तिथल्याच एका ओळखीच्या महिलेच्या मोबाईलवरील क्यूआर कोडवर ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये ट्रान्सफर करायला लावले.

Pune Police Extortion | Faraskhana Cops Suspended | Budhwar Peth
Teachers Protest : शाळा बंद ठेवून शिक्षक आंदोलनात सहभागी व्हाल तर खबरदार! थेट होणार कारवाई होणार; शिक्षण संचालकांचे आदेश

पैसे जमा होताच 'हा प्रकार कोणाला सांगायचा नाही' अशी धमकी देऊन पोलिसांनी तिथूनळ पळ काढला. मात्र, 'विनाशकाले विपरीत बुद्धी' या उक्तीप्रमाणे, या पोलिसांनी तरुणांना धमकावून पैसे उकळतानाचा सर्व प्रकार एका कॅब चालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि ही चित्रफीत सोशल मीडियावर तुफान व्हायरल केली.

हा व्हिडिओ समोर येताच पुणे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. त्यानंतर पीडित तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. चौकशीत गुन्हा स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन्ही पोलिसांवर आधी खंडणीचा गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर कर्तव्यात गंभीर कसूर करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत त्यांना तात्काळ निलंबित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com