Teachers Protest : शाळा बंद ठेवून शिक्षक आंदोलनात सहभागी व्हाल तर खबरदार! थेट होणार कारवाई होणार; शिक्षण संचालकांचे आदेश

Teachers strike Maharashtra : ​माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद राहू नयेत, असे काटेकोर निर्देश दिले आहेत.
Teachers warned against joining protest
Teachers warned against joining protestSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 09 Jul : राज्यात शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे. आज ९ जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनात जर कोणी शाळा बंद ठेवून सहभागी झाले, तर संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

एका दिवसाचे वेतन कापणार

​माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद राहू नयेत, असे काटेकोर निर्देश दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलनामुळे शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.क केले असून, शाळा बंद आढळल्यास थेट पगार कपातीची अस्त्र उगारले आहे.

​प्रशासनाचा कडक पवित्रा

शिक्षण विभागाच्या या नव्या आदेशामुळे आंदोलनात उतरणाऱ्या शिक्षकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाने केवळ इशारा न देता थेट आर्थिक कारवाईचा बडगा उगारल्यामुळे, शाळांमधील दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.

आंदोलन काळात शाळा बंद आढळल्यास किंवा कर्मचारी विनापरवानगी गैरहजर राहिल्यास प्रशासनाकडून तात्काळ शिस्तभंगविषयक आणि दंडात्मक पावले उचलली जाणार असल्याचे या परिपत्रकावरून स्पष्ट होत आहे.

Teachers warned against joining protest
Bombay High Court : म्हातारपणात आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना उच्च न्यायालयाचा मोठा दणका; आता थेट प्रॉपर्टीच परत घेतली जाणार

आंदोलनाचे मुख्य कारण काय?

कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्यता, पदोन्नती प्रक्रियेतील अटी, संचमान्यता धोरण आणि बीएलओ कामाच्या सक्तीच्या विरोधात शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह विविध शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय समिती, टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण सिनियर शिक्षक कृती समिती आणि मुख्याध्यापक संघ या आंदोलनात सहभागी झालेत.

Teachers warned against joining protest
Chandrashekhar Bawankule : आदिवासींना मिळणार स्वतंत्र सातबारा; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा

मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने या आंदोलनादरम्यान शाळा सुरू ठेवणे बंधनकारक केले असून, शाळा बंद आढळल्यास थेट पगार कपातीची अस्त्र उगारले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com