Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP-NCP Politics : भाजपने स्थगिती उठवली...राष्ट्रवादीने पुन्हा आणली स्थगिती!

Sampat Devgire

Manikrao Kokate News : राज्यातील पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगितीचा फेरा सुरूच आहे. तब्बल १५ महिन्यांपासूनची स्थगिती नुकतीच सत्ताधारी भाजपने उठविली. मात्र, १५ दिवस होत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावर पुन्हा स्थगिती आणली आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादीच्या या वादात अनेक कामे अडकली आहेत. (NCP MLA Manikrao Kokate stayed Tourism works in Sinner)

सिन्नर (Nashik) तालुक्यातील पर्यटन (Tourism) विकास विभागाच्या ५० कोटींच्या कामांना सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या लहरीपणामुळे स्थगितीच्या संगीत खुर्चीला सामोरे जावे लागत आहे. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) या वादात तालुक्यातील कामे मात्र लटकली.

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यभरात विकासकामांवरील स्थगिती आणि सत्ताधारी, विरोधी पक्षाचे आमदार यांच्यात भेद केला जाऊ लागला आहे. त्याचा थेट फटका मंजूर असलेल्या कामांना बसला आहे. त्याविषयी सातत्याने स्थानिक नेते, कार्यकर्ते मुंबईच्या वाऱ्या करीत असतात. मात्र, कोणीही त्याला दाद देत नाहीत.

नुकतीच सिन्नर तहसीलदार कार्यालयात झालेल्या पर्यटन विभागाच्या कामांच्या मंजुरीबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या वेळी तालुक्यातील जवळपास ५० कोटींची कामे बदलण्याची लहर आमदार कोकाटे यांना आली. तसे पत्र आमदार कोकाटे यांनी जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेला दिले आहे. त्यानुसार दोन्ही विभागांनी कामांची यादी संकलित करण्यास सुरुवात केली आहे. ही यादी पूर्ण झाल्यावर ती मंत्रालयात पाठविली जाईल.

महाविकास आघाडीचे सरकार जून २०२२ मध्ये अल्पमतात आल्यानंतर सर्वच विभागांनी घाई-घाईत विविध कामांना मंजुरी दिली होती. त्यात पर्यटन विभागाची विविध कामे होती. भाजपच्या पाठिंब्यावरील नवे सरकार सत्तेत येताच त्यांनी या कामांना स्थगिती दिली. त्यात पर्यटन विभागाची एक हजार ३२६ कोटींची कामे होती. यातील ४४८ कोटींच्या कामांवरील स्थगिती १२ सप्टेंबरला भाजपच्या मंत्र्यांनी नुकतीच उठवली होती. आता आमदार कोकाटे यांनी पुन्हा पत्र दिल्याने स्थगिती उठल्याचे समाधान क्षणिक ठरले. भाजप, राष्ट्रवादीच्या स्थगितीच्या खेळाचा फटका या विभागाला बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT