Devendra Fadnavis-Aaditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकच्या मैदानात, उरले सुरले सांभाळून ठेवण्यासाठी धडपड..

Aaditya Thackeray In Nashik : भाजपने नाशिकमध्ये एकदमच महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ऑपरेशन लोटस राबवत मविआला मोठा धक्का दिला. धडाधड मविआचे नेते फोडत आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या हातात कमळ सोपवलं.

Ganesh Sonawane

Nashik Politics : दोन्ही ठाकरे बंधूंनी मुंबई आणि नाशिक महापालिकेसाठी मनसे व शिवसेना(उबाठा) युतीची घोषणा केल्यानंतर युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आज, शनिवारी (ता. २७) नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

मुंबईतून दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताच त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपने दोन्ही ठाकरे बंधूंना नाशिकमध्ये मोठा दणका दिला. नाशिकमध्ये भाजपने उबाठा, मनसेसह काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडले आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर जे पक्षाची धुरा सांभाळत होते, इच्छुकांच्या मुलाखती घेत होते तेच मविआचे नेते भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत.

त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासह मविआमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली असून 'डॅमेज कंट्रोल' साठी स्वत: आदित्य ठाकरे नाशिकच्या मैदानात येऊन पक्ष कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत. कारण महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या युतीसंदर्भातील व जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यावर आल्या आहेत.

भाजपने शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते व माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, कॉंग्रेसचे शाहू खैरै, माजी नगसेवक संजय चव्हाण असे दिग्गज नेते गळाला लावल्याने आता पुढे काहीही होऊ शकतं. कुणावर भरोसाच राहीलेला नाही. कधी कोण कुठे जाईल हे सांगता येणार नसल्याने महाविकास आघाडीत उरल्या-सुरल्यांना सांभाळण्याची धडपड आघाडीतील नेत्यांनी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी तातडीने मुंबईहुन उबाठाचे नेते नाशिकमध्ये दाखल झाले व बैठक घेतली.

खासदार अनिल देसाई आणि उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांनी नाशिकमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात तातडीने बैठक घेतली. एकुण राजकीय परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक नेते खासदार राजाभाऊ वाजे, पक्षाचे नेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर आता थेट युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करणार आहेत. दरम्यान नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांनी कडाडून विरोध केला आहे. शिवसेना या मुद्द्यावर नाशिककरांच्या सोबत उभी ठाकली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे तपोवनास भेट देऊन पाहणी करणार आहेत. या ठिकाणी तपोवन बचाव समितीच्या पर्यावरणप्रेमींशी ते चर्चा करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT