Raj Thackeray setback : भाजपने राज ठाकरेंचा सगळ्यात मोठा नेता फोडला, पक्षप्रवेशही झाला ; नाशिकच्या राजकारणात खळबळ

Dinkar Patil joins bjp : नाशिकमध्ये भाजपने एकाचवेळी दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांचे महत्वाचे शिलेदार आज भाजपवासी झाले.
Dinkar Patil asserts that a Uddhav-Raj alliance can dominate from local bodies to the state assembly.
Dinkar Patil asserts that a Uddhav-Raj alliance can dominate from local bodies to the state assembly. sarkarnama
Published on
Updated on

Nashik political news : नाशिकच्या राजकारणात आज फार मोठा भूकंप घडला आहे. भाजपने उद्धव ठाकरेंपाठोपाठ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही मोठा धक्का दिला आहे. नाशिकमध्ये मनसेची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती अशा प्रमुख नेत्यानेच राज ठाकरेंची साथ सोडून भाजपत प्रवेश केल्याने खळबळ उडाली.

कालच मुंबईत पत्रकारपरिषद घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना(उबाठा) युतीची घोषणा केली. त्यानंतर आज भाजपने दोन्ही ठाकरे बंधूंना जबरदस्त धक्का दिला आहे. धक्कादायक म्हणजे नाशिकचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन वाघ, माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांचा आज भाजप प्रवेश ठरला होता. या सगळ्या नियोजनात मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील हे देखील आपल्या समर्थक माजी नगरसेवकांसह भाजप कार्यालयात दाखल झाले. यानंतर या सर्वांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला.

Dinkar Patil asserts that a Uddhav-Raj alliance can dominate from local bodies to the state assembly.
Devyani Pharande : देवयानी फरांदेंनी उठवलं रान ; यतीन वाघ, विनायक पांडे अन् शाहू खैरेंच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध

विनायक पांडे ,यतीन वाघ व शाहू खैरे यांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. मी निवडणुक प्रमुख असतानाही मला कोणतीही कल्पना दिली नाही असा आक्षेप आमदार फरांदे यांनी घेतला. फरांदे समर्थकांनी याविरोधात मोठे रान उठवले. भाजप कार्यालयाबाहेर मंत्री गिरीश महाजनांना घेरा घातला. परंतु फरांदे यांचा विरोध झुगारुन मंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा घातला आहे.

यात सगळ्यात धक्कादायक ठरला तो मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांचा झालेला भाजपप्रवेश. दिनकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता. कारण भाजपने त्यांना उमेदवारी नाकाराली होती. त्यानंतर नाशिक पश्चिम मधून मनसेने त्यांना विधानसभेला उमेदवारी दिली होती. मात्र दिनकर पाटील यांचा या निवडणुकीत भाजपच्या सीमा हिरे यांनी पराभव केला. आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर दिनकर पाटील यांनी पुन्हा भाजपत घरवापसी केली आहे.

Dinkar Patil asserts that a Uddhav-Raj alliance can dominate from local bodies to the state assembly.
Nashik Politics : नाशिकध्ये ठाकरे बंधूंना भाजकडून मोठा धक्का, ठाकरेंच्या दोन माजी महापौरांना लावलं गळाला

कालपर्यंत हेच दिनकर पाटील मनसेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. शिवसेना उबाठा व मनसेची युती व्हावी यासाठी धडपडत होते. काल, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर याच दिनकर पाटलांनी आनंदोत्सव साजरा केला होता. पण तेच दिनकर पाटील आज त्यांच्या आख्ख्या कुटुंबासहीत भाजपच्या गोटात सामील झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com