Nagar Political : टीडीएफ म्हणजेच शिक्षक लोकशाही आघाडीची 23 वर्षानंतर कार्यकारिणी जाहीर झाली. परंतु यात वादाची ठिणगी पडली आहे. टीडीएफ संघटनेची वाताहात झाली असून, तिची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे, अशी टीका होऊ लागली आहे. कार्यकारणी जाहीर करताना नगर जिल्ह्यातील एकाही कार्यकर्त्याला निवडीसाठी बोलवण्यात आले नव्हते. तसेच सर्वसाधारण सभेचा अजेंडा, हिशोब, नवीन कार्यकारिणी निवडीची तारीख, वेळ व स्थळ कोठेही प्रसिद्ध केलेले नाही.
त्यामुळे अचानक नगर जिल्हा टीडीएफची कार्यकारिणी एका बंद खोलीत तयार करून जाहीर करण्यात आल्याचा आरोप बीजाराव कोरडे यांनी केला आहे. माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष चांगदेव कडू, एम. एस. लगड, शंकराव जोरवेकर, शिवाजीराव हरिचंद्र, लता डांगे, दिलीप शेणकर, अच्युतराव जगदाळे यांच्यासह सक्रिय सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये याबाबत नाराजीचा सूर उमटला आहे.
या नवीन कार्यकारणीची पोस्ट समाज माध्यमांवर शेअर करण्यात आली असून, पंचसूत्री तसेच टीडीएफचा विचार आणि घटनेवर बोलणाऱ्यांना, अशी घरात बसून केलेली कार्यकारणी कशी मान्य आहे ? असा सवाल जिल्ह्यातील शिक्षक करत आहे. ही कार्यकारणी होण्यापूर्वी नगर येथे दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलमध्ये बैठक पार पडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्या बैठकीत सदस्य पदाधिकारी यांनी लोकशाही मार्गाने तालुका कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि नंतर जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात येईल, असे ठरले होते. परंतु जिल्ह्यातील एकही पदाधिकारी तसेच सभासद यांना माहिती न देताच सोशल मीडियावर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिक्षकांसमोर सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
जुनी पेन्शन योजना, शालार्थ आयडी, शालाबाह्य कामे, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, असे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. परंतु अशा प्रकारे हुकुमशाहीपद्धतीने संघटना तयार केल्याने शिक्षक लोकशाही आघाडीतील लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम काही मोजक्या लोकांनी केलेले आहे. हा प्रकार गंभीर असून या निवडीचा निषेध केला जात असल्याचेही कोरडे यांनी म्हटले आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.