Rani Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rani Lanke Candidate : राहुरी पोटनिवडणुकीचा धडा! विधान परिषदेत पवार-थोरात-लंकेंचा ‘बी-प्लॅन’? भाजपची वाढवली धाकधूक

Mahavikas Aghadi keeps backup strategy ready Rani Lanke enters Ahilyanagar MLC election race, adding new twist political battle : प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीत ऐनवेळीच्या निर्णयानंतर मविआ सावध होत विधान परिषदेसाठी काँग्रेसची दोन, तर शरद पवार राष्ट्रवादीकडून राणी लंके मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अत्यंत सावध आणि बहुपदरी रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागली होती. त्याच अनुभवातून धडा घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि मित्रपक्षांनी यावेळी ‘बी-प्लॅन’ तयार ठेवला असल्याचे बोलले जात आहे.

अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघाची (MLC Election) जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे संकेत आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून सुरुवातीला श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीचे सदस्य दीप चव्हाण यांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले.

मात्र, काँग्रेसची दोन नावे समोर असतानाच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक अनपेक्षित राजकीय चाल खेळत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार नीलेश लंके यांनी संभाव्य राजकीय घडामोडी लक्षात घेऊन पर्यायी उमेदवारीची तयारी ठेवली आहे. उमेदवारी, माघार आणि शेवटच्या क्षणी बदलणारी समीकरणे लक्षात घेता हा ‘बी-प्लॅन’ आखण्यात आल्याची चर्चा आहे.

अहिल्यानगरमधील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला थेट आणि संघटित आव्हान देण्याची क्षमता काँग्रेसकडे असल्याचे मानले जाते. मात्र, निवडणुकीतील राजकीय डावपेच, रणनीती आणि मतांची गणिते यांचा सर्वाधिक फटका अनेकदा काँग्रेसलाच बसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावेळी कोणतीही जोखीम न घेता महाविकास आघाडीने पर्यायी पर्याय सज्ज ठेवले असल्याचे सांगितले जात आहे.

करण ससाणे हे काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत. जयंत ससाणे यांनी यापूर्वी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. श्रीरामपूरच्या राजकारणात ससाणे कुटुंबाचा प्रभाव मानला जातो. दुसरीकडे, दीप चव्हाण हे काँग्रेसचे अहिल्यानगर शहरातील सक्रिय आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

या पार्श्वभूमीवर राणी लंके यांची उमेदवारी ही केवळ औपचारिक नसून महाविकास आघाडीच्या ‘बॅकअप स्ट्रॅटेजी’चा भाग असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात आणि अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या तरी पवार-थोरात-लंके यांच्या या ‘बी-प्लॅन’ने महायुतीची चिंता वाढवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT