ShivsenaUBT candidate withdrawal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ShivsenaUBT candidate withdrawal : 'मशाली'चा आईस्क्रिमचा कोन करणारे तिघे कोण? शहरप्रमुखांनी नावं सांगत, थेट 'मातोश्री'वर पाठवला अहवाल

Ahilyanagar Municipal Election Shiv Sena UBT Report on Three Candidate Withdrawals Sent to Uddhav Thackeray : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवारांच्या कारनाम्यांचा अहवाल शहरप्रमुखांनी 'मातोश्री'वर पाठवला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. काल माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सत्ताधारी पक्षाने विरोधकांना चांगलेच धक्के दिले.

यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या तीन उमेदवारांच्या प्रतापाचा अहवाल शहरप्रमुख किरण काळे यांनी थेट 'मातोश्री'वर धाडला. यात एकाने उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फाॅर्म न जोडणं, तर दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, असा प्रकार केला आहे.

शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी सांगितले की, गौरव ढोणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, त्यांना पक्षाने दिलेला एबी फॉर्म जोडलाच नाही. छाननीनंतर त्यांचे नाव अपक्ष म्हणून समोर आल्यानंतर पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेत विचारणा केली असता, त्यांनी दाखवलेल्या पोच पावतीवर ढोणे व निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही आढळली नाही, असे सांगितले.

गौरव ढोणे यांनी, एबी फॉर्म जोडलेला नाही, शौचालयाचा दाखला, तसेच ना देयके सादर केलेली नाहीत. ती 31 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत दाखल करावेत, असे सूचित करण्यात आले होते. यातून स्पष्ट होते की, ढोणे यांना पक्षाने दिलेला 'एबी फॉर्म' जोडलाच नाही. ढोणे यांनी जाणीवपूर्वक ही बाब पक्षापासून लपवून ठेवली. विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आल्या असून, पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, असे किरण काळे यांनी सांगितले.

भाजपचे (BJP) माजी नगरसेवक भैय्या परदेशी यांचे सख्खे बंधू कल्पेश परदेशी यांच्या मागणीवरून शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाकडून ऐनवेळी उमेदवारी दाखल करण्यात आली होती. पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी अर्ज मागे घेतला. तसंच सुनीता संजय कोतकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे एबी फॉर्म लावले होते. त्यांनी आमचा अर्ज मागे घेतला. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. ते मॅनेज झाले. विकाऊ लोकांना शिवसेनेत थारा नाही, असा संताप किरण काळे यांनी व्यक्त केला.

आमच्या अनेक उमेदवारांवर अर्ज मागे घेण्याकरिता सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. प्रचंड मोठ्या रकमांची आमिष दाखविण्यात आली. परंतु प्रामाणिक शिवसैनिक विकले गेले नाहीत. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी एकही जागेवरचा विरोधी पक्षाचा उमेदवार बिनविरोध झालेला नाही, असा दावा किरण काळे यांनी केला.

शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाच्या महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांच्या विरोधात आमचेच घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे चार, तर काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवारांचे अर्ज हे माघारीनंतरही राहिले आहेत. याबाबत दोन्ही पक्षांशी आमची बोलणी सुरू आहे. तिथं शिवेसना ठाकरे सेना पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार करता येतो हे आज सायंकाळीपर्यंत स्पष्ट करू, असे किरण काळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT