Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : खासदार लंकेंना भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूमागे वेगळीच शंका; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना 'सीसीटीव्ही' फुटेज पाठवणार

MP Nilesh Lanke CCTV footage death four Shirdi beggars Maharashtra CM Health Minister hospital Ahilyanagar : शिर्डीतील चौघा भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी खासदार नीलेश लंके चांगलेच आक्रमक झाले असून, त्यामागे मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखेंना घेरण्याची रणनीती आखत आहेत का?

Pradeep Pendhare

Shirdi beggars death case : शिर्डीतील चौघा भिक्षेकऱ्यांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि ठाकरेंची शिवसेना चांगली आक्रमक झाली आहे. खासदार लंकेंना या भिक्षेकऱ्यांच्या मृ्त्यूमागे वेगळीच शंका असून, त्याचा त्यांनी शोध सुरू केला आहे.

तत्पूर्वी त्यांनी माजी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता, या घटनेप्रकरणी एका युवा नेत्याच्या मागणीमुळे भिक्षेकऱ्यांना बेगर होममध्ये डांबलं गेलं, अन् ही घटना घडली, असे म्हणत लक्ष केलं होत. आता जिल्हा रुग्णालयाकडे सीसीटीव्ही आणि भिक्षेकर्‍यांच्या मृत्यू अहवालाची मागणी केल्याने खासदार लंकेंनी या प्रकरणात घातलेलं लक्ष विखे पिता-पुत्रांची डोकेदुखी वाढवणार, असे दिसते आहे.

जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज व उपचारासंदर्भातील माहिती प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये काही संशयास्पद आढळल्यास, हा मुद्दा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याची तयारी नीलेश लंके यांनी केली आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील वेळप्रसंगी करू असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे.

भिक्षेकरांच्या मृत्यूनंतर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा रूग्णालय आणि प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. चार भिक्षेकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू, ही घटना संशयास्पद असल्याचे निरीक्षण खासदार लंके यांनी नोंदवले. या घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अपघात वॉर्ड नंबर एक, बेगर वॉर्ड, भिक्षेकरूंना ठेवण्यात आलेल्या किंवा उपचार केलेली खोली/वॉर्डमधील सीसीटीव्ही फुटेज, भिक्षेकऱ्यांवर करण्यात आलेल्या उपचाराचा तपशील, आयपीडी पेपर/नोट्स यांची मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे खासदार लंकेंनी केली आहे. खासदार नीलेश लंके यांनी मारहाणीमुळे या भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला असेल, तर या घटनेच्या मुळाशी जावे लागेल, असे सांगितले.

तीन भिक्षेकरू मिसिंग...

दरम्यान, बाळासाहेब रामराव आग्रे (वय 33), रमेश गंगाधर सूर्यवंशी (वय 52) व रामदास सखाराम निकर उर्फ निकम (वय 55) हे तीन भिक्षेकरून रुग्णालयातून पसार झाल्याचे समोर आले आहे. या तिघांच्या मिसिंग संदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी नोंद करण्यात आली. बेगर गृहाचे केअर टेकर दामोदर रामचंद्र बिदे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचा कारणं समोर....

जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंची किडनी आणि यकृत निकामी झाल्याचे उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवाल समोर आलं. तसंच रक्ताच्या तपासणीतही याबाबी आढळल्या आहेत. शिर्डी पोलिस, नगर परिषद आणि साई संस्थान यांनी शिर्डीतील भिक्षेकरूंना पकडून श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील बेगर होममध्ये दाखल केले होते. यातील दहा जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना सहा एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT