Nitesh Rane Thackeray warning : 'राणे साहेबांच्या अटकेचा क्षण अजूनही मोबाईलमध्ये सेव्ह'; भाजप मंत्री राणे म्हणाले, 'तेव्हाच तो डिलिट...'

Maharashtra minister Nitesh Rane Thackeray Shiv Sena Sindhudurg BJP MP Narayan Rane MVA government : मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तत्कालीन मविआ सरकारने वडील भाजप खासदार नारायण राणे यांच्या अटकेच्या जुन्या क्षणावर सिंधुदुर्गमध्ये मोठं भाष्य केले.
Nitesh Rane Uddhav Thackeray 1
Nitesh Rane Uddhav Thackeray 1Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg politics : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकार चालवत असताना, भाजप खासदार नारायण राणे त्यावेळी केंद्रीय मंत्री होते. ठाकरेंवर टीका करताना, खासदार राणेंनी ठाकरेंच्या कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केलं होते.

यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी 24 ऑगस्ट 2021 मध्ये अटक केली होती. खासदार राणेसाहेंबाविरुद्ध झालेली कारवाई आपल्याला किती जिव्हारी लागली आहे, यावर त्यांचे पुत्र भाजप मंत्री नीतेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये उजाळा देताना, उद्धव ठाकरे शिवसेनेला इशारा दिला आहे.

खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गमध्ये काल वाढदिवस झाला. या कार्यक्रमाला महायुतीचे नेते उपस्थित होते. भाजप मंत्री नीतेश राणे यांनी खासदार राणे साहेबांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या अटकेवर मोठं भाष्य केले. हे करताना, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सेना पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.

Nitesh Rane Uddhav Thackeray 1
Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरी अमित शहा भोजन करणार, एकनाथ शिंदेंचा लाडका मंत्री अस्वस्थ?

भाजपचे (BJP) नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना, रत्नागिरीमधून त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली होती. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी या कारवाईला भाग पाडल होतं, अशी भाजप मंत्री राणे यांनी आठवण करून दिली. खासदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भर सभागृहात ही आठवण करून देताना, भाजप मंत्री राणे यांनी सर्वांची वेळ येते, असा इशारा दिला.

Nitesh Rane Uddhav Thackeray 1
100 Days Performance : महायुती सरकारचं 100 दिवसांचं कृती अभियान; पास की फेल?

अटक केलेला क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी परत फेड करेन, त्याच दिवशी डिलिट करेल. कोणाला सोडणार नाही, असा इशारा मंत्री राणे यांनी ठाकरे शिवसेनेला दिला. आणि तो क्षण देखील टप्प्या टप्प्याने जवळ देखील आला आहे. मी कशाबाबत बोलतो आहे, असे म्हणताना, मंत्री राणेंचा रोख हा आमदार आदित्य ठाकरेंकडे होता.

दहा वर्षांच्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवायला पाहायला मिळाल्या, असे सांगतानासिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्याच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेल देखील पाहिला, अशी कोपरखळी लगावताना, त्यांनी लोकसभेला जी आम्हाला साथ दिली त्यामुळे त्या जुन्या आठवणी पुसल्या गेल्याचे मंत्री राणे यांनी म्हटले. तिसऱ्या कोणालातरी खुश करण्यासाठी केसरकर यांनी ते केलं होतं, त्यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं असेंही मंत्री राणे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com