Congress And Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress And Sharad Pawar : काँग्रेसची तिरकी चाल; शरद पवारांची भेट, शिवसेनेची झोपच उडवली!

Ahmadnagar Congress officials met Sharad Pawar : महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांची भेट घेऊन नगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगर शहर आणि श्रीगोंदा जागेसाठी साकडे घातले. या भेटीमुळे नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीत विसंवाद सुरू असल्याचे समोर आले.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अहमदनगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या गाठीभेटीच्या सत्रामुळे नगर जिल्ह्यातील राजकारणात विधानसभा निवडणुकीत बरीच उलथापालथ होणार, असे संकेत मिळालेत. शरद पवार यांची भेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तिरकी चाल केल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेत अहमदनगर शहर आणि श्रीगोंदा मतदारसंघाची साकडे घातले आहे. तत्पूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाने देखील अहमदनगर शहर विधानसभेसाठी साकडे घातले. त्यामुळे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत विसंवाद वाढू लागल्याचे चित्र आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी पुण्यात मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष संपत म्हस्के, प्रताप शेळके, बाबासाहेब गुंजाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नगर दक्षिणमध्ये काँग्रेसकडे एकही जागा नाही. त्यामुळे नगर शहर आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी याकडे जयंत वाघ यांनी लक्ष वेधले.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील चाचपणी सुरू आहे. परंतु या मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेस, अशी परंपरागत लढत झाली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाने मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. यासाठी शरद पवार यांची शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्वीच भेट घेतली आहे. कामाला लागा, असा आदेश घेऊन आला असल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. तिथे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप, अशी लढत झाली होती. भाजपला निसटता विजय मिळाला. तेथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा कायम आहे. माजी आमदार राहुल जगताप तेथून शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. परंतु तिथे शिवसेना ठाकरे गटाने दावा केल्यामुळे राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदा जागा शिवसेनाच लढवणार असे काहीसे संकेत दिलेत. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण, की उलथापालथ होणार, याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

नगर दक्षिणमध्ये खाते उघडण्यासाठी 'फिल्डिंग'

काँग्रेसला नगर दक्षिणमध्ये खाते खोलण्याची इच्छा आहे. त्यासाठी काँग्रेस जोर लावत आहे. ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे महाविकास आघाडीत नगर जिल्ह्यातून त्यांचा शब्दाला वजन वाढले आहे. बाळासाहेब थोरातांच्या एकहाती नेतृत्वामुळे काँग्रेस देखील जोमात आहे. त्यामुळे नगर दक्षिणमधून काँग्रेसने नगर शहर आणि श्रीगोंदा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. यातच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही मतदारसंघाची थेट मागणी केली. त्यामुळे काँग्रेसच्या दाव्याला बळ मिळू लागले आहे. महाविकास आघाडीत या दोन्ही मतदारसंघात नेमका काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT