भाजप युवा नेते विवेक कोल्हे ( Vivek Kolhe ) कोपरगाव तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. लोकप्रतिनिधींच्या उपस्थित शिधा वाटप होणार असल्याचे संदेश मोबाईल प्रशासनाकडून पाठवले जात आहे. यामुळे रेशन कार्डधारकांना वेळेवर शिधा वाटप होत नसल्याचा आरोप करत विवेक कोल्हे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भर बैठकीत झापले. तसेच, अजित पवार गटातील आमदार आशुतोष काळे ( Ashutosh kale ) यांना कोल्हेंनी अप्रत्यक्षपणे इशाराही दिला आहे.
नेमकं काय घडलं?
कोपरगाव तालुक्यातील ( Kopargaon Taluka ) संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, घरकुल योजना, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे प्रलंबित अनुदान, विविध विकासात्मक योजना या केवळ लाभार्थी समितीची बैठक गेले सहा महिन्यांपासून झाली नाही. त्यामुळे हजारो नागरिकांचे प्रकरणे प्रलंबित राहून कोट्यवधी रुपये मिळण्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नसल्याने विवेक कोल्हे ( Vivek Kolhe ) यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालय गाठून अपर तहसीलदार विकास गंबरे यांची भेट घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी विविध गावातून आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. मात्र, विवेक कोल्हे नागरिकांच्या समस्या मांडत असताना तहसीलदार गंबरे आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर कुजबूज करत होते. यामुळे कोल्हे भर बैठकीत तहसीलदार गंबरे यांच्यावर चांगलेच संतापले.
"लोकप्रतिनिधींना कसं आणायचं मला माहिती"
तसेच, "वैयक्तिक लाभाच्या योजनांसंदर्भात लोकप्रतिनिधींची वेळ घेऊन बैठक बोलवू," असं तहसीलदार गंबरे यांनी म्हटलं. यावरून कोल्हेंनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरलं. "लोकांच्या कामासाठी लोकप्रतिनिधींना वेळ नाही. त्यांना कसे आणायचे हे मला माहित आहे. बैठक लावा. लोकप्रतिनिधी जरी आमचे राजकीय विरोधक असले, तरी आम्ही लोकांच्या कामासाठी त्यांना वाजत गाजत घेऊन येऊ," असे विवेक कोल्हेंनी आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता म्हटलं.
"...अन्यथा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन"
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपर्यत बैठक घेऊन सर्व कामे मार्गी लावावीत. अन्यथा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करू," असा इशारा विवेक कोल्हेंनी दिला आहे.
"...अन् जनतेला मदत काही मिळेना"
"आमदारांनी केवळ तोंडाला पाने न पुसता काम करावे. गरीब जनतेला देण्यासाठी वेळ नाही, असे वर्तन करत आहेत. कोट्यवधींच्या केवळ वल्गना आणि जनतेला मदत काही मिळेना," असा आरोप करत विवेक कोल्हेंनी आशुतोष काळेंना लक्ष्य केलं.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.