sujay vikhe nilesh lanke sakarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Lok Sabha Constituency : 'गरिबांची टिंगल करतात, सुजय विखेंना पैशाची मस्ती...' 'इंग्रजी'च्या आव्हानानंतर नीलेश लंकेंनी सुनावलं

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : नीलेश लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवेतर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.

Roshan More

Loksabha Election 2024 : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके लढत होत आहे. एकमेकांना टार्गेट करण्याची संधी दोन्ही उमेदवार सोडत नाहीत. नीलेश लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवे तर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे चॅलेंज सुजय विखे यांनी लंकेंना दिले. त्याला लंके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सुजय विखे (Sujay Vikhe) श्रीमंत घरातील आहेत. ते माझ्यासारख्या गरीब उमेदवारीचा टिंगल करत आहेत. ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे, असे प्रत्युत्तर नीलेश लंके यांनी दिले. तसेच ही लढाई श्रीमंत विरुद्ध गरीब असल्याचे लंके यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लंके (Nilesh Lanke) म्हणाले, मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही. एका बाजूला सांगायचे की जे सक्षम आहे त्यांनी राजकारणात यावे. आणि दुसऱ्या बाजूला टिंगल करायची. त्यापेक्षा पाच वर्षांत काय काम केले त्यावर बोला.

विखे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी. मागील पाच वर्षांमध्ये काय केले हे सांगावे. वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यापेक्षा संसदेत प्रश्न किती प्रभावीपणे मांडू शकतो, सर्वसामान्य माणसांना न्याय देऊ शकतो ही भूमिका महत्त्वाची आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT