Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : नारायण राणेंचा प्रचार सुरू पण...; उदय सामंतांनी केला मोठा दावा

Loksabha Election 2024 : नारायण राणेंनी प्रचारालादेखील सुरुवात केली आहे, तर शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या किरण सामंत यांनी ही जागा सोडत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केली.
Uday Samant, Naryan Rane
Uday Samant, Naryan Ranesarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात शिंदे गटाची ताकद नसल्याची तोफ डागली. वरिष्ठांनी संधी दिली तर आपण लढू, असे राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज (बुधवार) नारायण राणेंनी प्रचारालादेखील सुरुवात केली आहे, तर शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या किरण सामंत यांनी ही जागा सोडत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी या जागेवरून मोठा दावा केला आहे.

Uday Samant, Naryan Rane
Kokan Politics: कोकणात नवा ट्विस्ट; किरण सामंतांची माघार; महायुतीकडून नारायण राणेंचे नाव फायनल?

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला. त्यामुळे या जागेचा तिढा अजून सुटला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

किरण सामंत (kiran samant ) यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरदेखील उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरण सामंत यांना वाटले की ही जागा आपण दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रात्री उशिरा आपण माघार घेत असल्याचे स्टेटस ठेवले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्टेटस त्यांनी डिलीट केले, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.

मतदारसंघावर दावा करण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. अजूनही आमच्या आशा आहेत की हा मतदारसंघ निश्चितपणे शिवसेनेकडेच राहील, असा दावा उदय सामंत यांनी केला.

R

Uday Samant, Naryan Rane
Devendra Fadnavis News : "आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो," फडणवीस असं का म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com