Loni Police Station Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Crime News : जमावाचा शस्त्रांनी हल्ला अन् गोळीबार; नगरमधील ममदापुरात थरार...

Pradeep Pendhare

Rahata News : लोणीच्या बाजारातून ममदापूर येथे कत्तलीसाठी जनावरे आल्याची माहिती मिळाल्याने ते ठिकाण दाखवायला गेलेल्या व्यक्तींवर तेथील जमावाने तलवारी, कोयत्याने हल्ला केला. तसेच एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी सायंकाळी ममदापूर (ता. राहाता) येथे घडली. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात १६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राणी कल्याण समितीचे आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे (वय ३९, रा. तांदुळनेर, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली. नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, नजीम कुरेशी, साजीद कुरेशी, वसीम कुरेशी, समीर कुरेशी, अजीम शहा, शाकीर शहा, जतीफ कुरेशी, मुनीर कुरेशी, इम्रान अब्दुल हक शेख, अन्सार इब्राहीम शेख, नाझीम फकीर महंमद शेख, मुदतसर यासीन शेख, हुसेन फकीर महंमद शेख (सर्व रा. ममदापूर, ता. राहाता) यांच्याविरूद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, लोणी (Loni)च्या बाजारातून जनावरे ममदापूर येथे नेवून कत्तलीसाठी आणल्याची माहिती नाईकवाडे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांना दिली. यावर तत्काळ अॅक्शन घेत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कत्तलीचे ठिकाण दाखवण्यासाठी गोरक्षक दलाचे ईश्वर ज्ञानदेव टिळेकर, साईराज सोपान बेंद्रे आणि नाईकवाडे खासगी वाहनाने ममदापूर गावातील कुरेशी मोहल्ल्यामागे गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेथे काही लोकांनी गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवली होती. हौदात मांसांचे तुकडे, हाडे पडलेली होती. दोन गोवंश जनावरांची कत्तल केलेली होती. तेथील बांधलेली जनावरे तेथून सोडताना जमलेल्या दहा ते बारा लोकांनी अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. जमावातील लोकांनी हातातील कोयते, तलवारी, काठ्यांनी मारहाण केली. यावेळी साईराज बेंद्रे यास नियाज कुरेशी याने 'तुझे आज छोडूंगा नही, तुझे खत्म कर दूंगा, मार डालो इसको', असे म्हणून त्यांच्या डोक्यात हत्याराने मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

जमाव उग्र झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथून जात जमावातील एकाने नाईकवाडी यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. तसेच लोकांनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना शेतात लपून बसण्याची वेळ आली. जमावामे फिर्यादींची वाहने, दुचाकींचे मोडतोड करून नुकसान केले. या घटनेत नाईकवाडींचे पाकीट व ईश्वर टिळेकर यांची चैन, हातातील ब्रासलेट कोठेतरी पडले. त्यानंतर पोलिसांनी शेतात फिर्यादींना बाहेर आणल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT