Lok Sabha Winter Session : लोकसभेसाठी मोदींचा नवा डाव ? भाजपकडून सर्व खासदारांना 'व्हिप' जारी

BJP Whip To MP : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे.
Narendra Modi News
Narendra Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पाच राज्यांच्या निकालानंतर एकीकडे भाजपा पुन्हा फाॅर्मात आल्याचे दिसून येत असतानाच आता लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरू झाले आहे. हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवरुन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या 17 दिवसांच्या संसदीय कामकाजात मोदी सरकार 2 वित्त विधेयकांसह तब्बल 25 इतर विधेयके मंजूर करण्याची शक्यता आहे. या विधेयकांपैकी काही विधेयकांवर काँग्रेसने यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. मात्र, अशातच भाजपकडून सर्व खासदारांना शुक्रवारी (ता.8) लोकसभेत उपस्थित राहण्यासंबंधी व्हिप बजावण्यात आला आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील विजयानंतर भाजपचा (BJP) आत्मविश्वास दुणावला आहे. या आधीच भाजपने लोकसभा 2024 साठी चारशे प्लसचा नारा दिला आहे. त्यामुळे मोदी - शाह पुन्हा मोठा एखादा डाव टाकून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचं हिवाळी अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Narendra Modi News
Aditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या चौकशीतून 'मातोश्री'ला शरण आणण्याचा डाव?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्याचा मुद्दा, 'पीओके'वरुन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर गंभीर आरोप करत काँग्रेसला खिंडीत गाठले आहे.

एकीकडे यावरुन तापलेले राजकीय वातावरण असतानाच आता 8 डिसेंबरला भाजपाने आपल्या लोकसभेतील खासदारांना उपस्थितीसाठी व्हिप जारी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या कामकाजाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींवर लोकसभेत चर्चा होणार असून त्यामध्ये सकारात्मकतेसाठी खासदारांची उपस्थिती आवश्यक असल्याचं नमूद केले आहे.

भाजपने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 8 डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी एक ओळीचा व्हिप (Whip) जारी केला आहे. कारण काही अत्यंत महत्त्वाच्या कायदेविषयक कामकाजावर चर्चा होणार असल्याची माहिती त्या ट्विटमध्ये दिली गेली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi News
Devendra Fadnavis:"...म्हणून नवाब मलिकांना 'महायुती'त घेता येणार नाही!"; फडणवीसांचं अजितदादांना पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com