Nagpur Winter Assembly Session 2023 : आताच्या शिवसेना फुटीला अप्रत्यक्षपणे सर्वस्व जबाबदार धरत विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर पक्ष फुटला नसता, असा दावा गोऱ्हेंनी केला. यावर खासदार विनायक राऊतांची कडक शब्दात गोऱ्हेंवर निशाणा साधला. परिणामी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तासंघर्षावर बोलताना गोऱ्हेंनी नाव न घेता ठाकरे गटाला लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, 'शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेमध्ये आता पडली ती फूट अजिबात पडली नसती. त्यांनी पुढाकार घेत नाराजांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता. वेळ पडली असती तर त्यांनी स्वत: कार काढून समजूत काढून बंडखोरांना परत आणले असते. त्यांनी नेमके काय केले असते, हे आता सांगता येणार नाही पण, त्यांनी नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता.'
नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर खासदार विनायक राऊतांनी नाव न घेता जहरी टीका केली. राऊत म्हणाले, "नीलम गोऱ्हेंसारखी बेइमानी औलाद राज्यात जन्माला आली, हेच आमचे दुर्दैव आहे. आपल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकीत साडेचोवीस वर्षे उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेच्या माध्यमातून सत्ता उपभोगली. त्यावर अशा पद्धतीने वर्तुवणूक केले, हे विकृतीचे लक्ष आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना फुटीला कायम उद्धव ठाकरेंना (Uddhav Theckeay) जबाबदार धरले जात आले आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, "नीलम गोऱ्हे यांच्या तोंडून भाजप आणि शिंदे गट सर्व काही वदवून घेत आहे. त्यांच्या माध्यमातून बाडगं अधिक कोडगं असते, हेच स्पष्ट होते आहे", असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.