Rohit Pawar and Nilesh Lanke and Vijay Auti  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Parner Politics: नीलेश लंकेंचं टेन्शन वाढणार ? रोहित पवारांनी विजय औटींना दिला मोठा शब्द

Rohit Pawar, Nilesh Lanke and Vijay Auti : विजय औटी यांच्याबाबत रोहित पवार यांनी मोठे विधान केले.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: पारनेरमध्ये आज आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेला भाऊबीज कार्यक्रम पारनेर तालुक्यातील येणाऱ्या काळातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार अशीच नांदी देणारा दिसून येत आहे.

आमदार नीलेश लंके यांचे खंदे समर्थक समजले जाणारे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी आता लंके यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंगच बांधलाय. या पार्श्वभूमीवर आज पारनेरमध्ये संपन्न झालेल्या भाऊबीज कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी विजय औटींबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. या फुटीत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांत नीलेश लंकेही आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला येथून 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार लंकेंसारख्या एकहाती वर्चस्व असलेल्या उमेदवारासमोर तगडा उमेदवार देणे आवश्यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या परिस्थितीत आमदार नीलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून मतदारसंघात युवा संघटन उभा करत असलेले आणि तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेले पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार यांच्या संपर्कात राहून उमेद्वारीची मागणी आज जाहीरपणे केली.

पवारसाहेबांनी आणि रोहितदादांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा, तुम्हाला निराश करणार नाही, अशी मागणी औटी यांनी भाषणात केली. आपण येणारी विधानसभा निवडणूक लढवणारच, असेही त्यांनी माध्यमांना स्पष्टपणे सांगितले.

यावर रोहित पवार यांना औटी यांच्या उमेदवारीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून असलेल्या अपेक्षेबद्दल विचारले असता, त्यांनी विजय औटी हे पवारसाहेबांच्या आणि माझ्या संपर्कात आहेतच. साहेबांना ते कधीही भेटू शकतात ही परस्थिती आहे. पवारसाहेबांसोबत भक्कमपणे उभे असणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, यातून आपण समजून घ्या, असे सूचक विधान रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.

एकंदरीतच पारनेर विधानसभा निवडणुकीत 2024 ला लंके विरुद्ध औटी अशी लढत होण्याची दाट शक्यता आता दिसू लागली आहे. यात नीलेश लंके हे लोकसभा निवडणुकीसाठीही इच्छुक असल्याचे चर्चा आहे. त्यामुळे नगर दक्षिणेतील राजकारण एका वेगळ्या वळणावर यंदा असणार आहे. यात नीलेश लंके आपली भूमिका आहे, तशीच ठेवणार की काही धक्कादायक निर्णय घेणार, यावरही जिल्ह्यात मोठी चर्चा आणि उत्सुकता आहे.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT