Ajit Pawar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवार 21च्या बैठकीत लोकसभेचा 'बॉम्ब' फोडणार

Ajit Pawar Gat Meeting : प्रकृती सुधारताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहांची भेट घेतली. यानंतर आता अजितदादांचं पुढचं पाऊल काय असेल? याची उत्सुकता आहे...

Pradeep Pendhare

Maharashtra Politics News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला दिवाळीनंतर वेग येणार आहे. सर्वच पक्षांकडून सध्या चाचपणी सुरू आहे. यात महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सर्वांचेच लोकसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू झाली आहे. दिवाळीनंतर या चाचपणीला अधिक वेग येणार आहे. यासंदर्भात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अलिकडच्या काळात दिल्ली दौरे वाढले आहे. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील विविध राजकीय घडोमोडींचा आढावा होत असतो. लोकसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका आहेत. लोकसभेच्या निकालाचा या निवडणुकांवर देखील प्रभाव असणार आहे. निवडणुकांची राजकीय गणिते जुळवण्यासाठी अजित पवार आता मैदानात उतरले आहे. अजित पवार गटाची मुंबईत 21 नोव्हेंबरला होणार आहे. ही बैठक दिवाळीपूर्वीच होणार होती. परंतु अजित पवार आजारी पडल्यामुळे ही बैठक लांबणीवर पडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीत अजित पवारांकडून लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदारांचे काय म्हणणे आहे, किती आमदार लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारी किंवा इच्छा व्यक्त करतात, याची चाचपणी केली जाणार आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीकडून वेगळा होऊन भाजप महायुतीच्या सत्तेत सहभागी झाला आहे. सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला न्याय्य वाटा मिळत नसल्याच्या आमदारांच्या तक्रारी आहेत. आमदारांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही मंत्रालय पातळीवर अडचणी आहेत. या समजावून घेऊन अजित पवार त्यावर मार्गदर्शन करणार आहे.

दिल्ली दौऱ्यातील चर्चेची उत्सुकता...

भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान शहा यांच्याबरोबर काय चर्चा झाली, यावर अजित पवार बैठकीत काय भाष्य करतात, याकडे देखील आमदारांचे लक्ष लागले आहे. अजित पवार लोकसभांना संपूर्ण ताकदीने खरंच समोरे जाणार आहेत का, वेगळा निर्णय घेणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरांसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शरद पवार गटाची 16 जागांवर नजर

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने राज्यात 16 लोकसभा मतदारसंघात निर्णायक चाचपणी केली आहे. अहमदनगर, बारामती, माढा, बीड, हातकणंगले, रावेर, कोल्हापूर, सातारा, सांगली, भंडरा, शिरूर, मावळ, ईशान्य मुंबई या मतदारसंघाचा यात समावेश आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अधिक अनुकूल असल्याचे निरीक्षकांचे निरीक्षण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT