Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajil Pawar News : देशात नरेंद्र मोदींशिवाय दुसरा नेताच नाही!

अजित पवार यांचे शासन तुमच्या दारी कार्यक्रमासाठी नाशिकला आगमन झाले.

Sampat Devgire

Ajit Pawar on Narendra Modi : कालपर्यंत नरेंद्र मोदी आणि भाजपचा राजकीय समाचार घेणारे अजित पवार सत्तेत सहभागी होताच त्यांचा सूर बदलला आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा नेताच नाही, अशी स्तुतीसुमने त्यांनी उधळले. (Ajit Pawar appriciate BJP leadership of Naraendra Modi)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बंडखोर गटाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे काल नाशिकला (Nashik) आगमन झाले. यावेळी कार्यकर्ते, नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) कामकाजाचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नाशिकला होणाऱ्या शासन तुमच्या दारी या उपक्रमासाठी आगमन झाले. यावेळी त्यांचे नाशिक रोड रेल्वेस्थानकावर त्यांचा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

यावेळी विश्रामगृहावर शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही सर्व आमदार कुटूंब म्हणून एकत्र आहोत. त्यामुळे सध्या मी माहिती घेत आहे. लोकाभिमुख कामे करण्यावर आमचा भर असेल. लोकांसाठी काम करतांना आम्ही सर्वच मंत्रीमंडळ व शासन म्हणून काम करणार आहोत. रस्त्यांची स्थिती पुरेशी चांगली नाही. त्याची देखील माहिती घेत आहोत ही कामे केली जातील.

यावेळी त्यांनी मी विरोधात होतो तेव्हा देखील शासन तुमच्या दारी या उपक्रमावर टिका केली नव्हती. काही प्रकल्पांबाबत मी विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेत होतो. मात्र आता स्थिती वेगळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे करीष्मा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा नेता देशात नाही. त्यांच्या कामकाजाची पध्दत अतिशय चांगली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावेच लागेल.

मी कार्यभार स्विकारून अवघा एक दिवस झालेला आहे. त्यानंतर लगेच कामाला सुरवात देखील केलेली आहे. मी सकाळी लवकर मंत्रालयात येऊन काम करणारा मंत्री आहे. ज्या ज्या आमदारांनी मला पाठींबा दिला, नागरिकांनी पाठींबा दिला त्या सर्वांचे मी आभार व्यक्त केले. लवकरच अन्य सर्व विषयांवर काम होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT