NCP Crisis Update : बंड केलं, सत्तेत आले पण निष्ठा कायम; अजितदादांच्या केबिनमध्ये शरद पवारांचा फोटो !

Sharad Pawar And Ajit Pawar : शरद पवारांच्या इशाऱ्यानंतरही अजित पवारांनी वापरला फोटो
Photo in Ajit Pawar Cabin
Photo in Ajit Pawar CabinSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Photo In Ajit Pawar Cabin : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आपुलकीची भावना व्यक्त केली. शरद पवार आमच्यासाठी पांडुरंग असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. तर सर्व कार्यक्रमातील फलकांवर शरद पवार यांचा फोटो लावण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता. त्यानुसार बंडखोर गटाच्या कार्यक्रमात पवारांचा फोटो दिसला. यावरून शरद पवार यांनी त्यांचे नाणे चालत नसल्याने माझ्या फोटो वापरावा लागत असल्याचा टोलाही अजित पवार यांना लगावला होता. (Latest Political News)

Photo in Ajit Pawar Cabin
Ajit Pawar News : अजितदादांचा 'कॉन्फिडन्स' जोरातच ! 'तिजोरी'वर सकाळ-सकाळीच फिरवली नजर

सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शुक्रवारी (ता. १४) राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. यात अजित पवार यांना अर्थखाते मिळाले आहे. दरम्यान, बंड केल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. असे असले तरी पवार यांच्याप्रति अजितदादांची श्रद्धा कायम असल्याचे दिसून येत आहे. खातेवाटप होताच अजित पवार यांनी आपल्या दालनात खुर्चीमागे शरद पवार यांचा मोठा फोटो लावला आहे.

विकासकामांचा आणि निधीचा दाखला देत अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी पक्षासह घड्याळ या चिन्हावरही दावा सांगितला. त्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यानंतर पवारांनी अजित पवार गटाला आपला फोटो न लावण्याचा इशारा दिला होता. मात्र सर्व फलकांवर पवारांचा फोटो असेल, असे अजितदादांनी जाहीर केले होते. यानंतर अजित पवार यांनी आपल्या दालनातही शरद पवार यांचा फोटो लावला आहे. या दालनाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Photo in Ajit Pawar Cabin
Maharashtra Politic's: सुनिल शेळके, संग्राम जगताप, यशवंत माने, कोकाटेंना पवारांचा दणका; 12 आमदारांना पाठवली नोटीस

दरम्यान, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास शिंदे गटातील मंत्र्यासह आमदारांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र पवारांनीही आपल्याला हवे असलेले अर्थखाते मिळवले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांनाही वजनदार खाती मिळवून देण्यास पवारांना यश आले आहे. दरम्यान, दोन मंत्रिपंदाची बदली झाली असली तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची पदे कायम राखली आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com