Lahu Kanade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lahu Kanade News : अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी घोषित करा; काँग्रेस आमदाराने उचलला विडा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस आमदार लहू कानडे सरसावले आहेत. आमदार कानडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडणार आहेत.

अंगणवाडी कर्माचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानसभेत आमदार लहू कानडे यांनी आवाज उठवावा यासाठी नगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनने भेट घेत चर्चा केली. अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या समस्या मांडल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 2017 च्या निकालाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे. युनियनने आमदार कानडे यांचे याकडे लक्ष वेधले. अंगणवाडी कर्मचारी हे वैधानिक पद असून, त्यांना मिळणारा मोबदला मानधन नसून वेतन आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी घोषित करावे. त्याअनुषंगाने वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटल्याची माहिती युनियनने आमदार कानडे यांना दिली. ( Ahmednagar Politics News )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सेविका व मदतनीस यांचे मानधन किमान 18 ते 26 हजारांपर्यंत असावे, सेविका व मदतनीसांच्या मानधनात 100/75, असे प्रमाण असावे. मानधन महागाई निर्देशांकास जोडून दर सहा महिन्यांनी त्यात वाढ करावी. सेवा समाप्तीनंतर पेन्शन देण्याचा तत्त्वत: मंजूर असलेल्या प्रस्तावाची हिवाळी अधिवेशनात अंमलबजावणी करावी. महापालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी किमान पाच ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करावे. आहाराचा प्रतिविद्यार्थी आठ रुपये हा दर अत्यल्प असून, साधारण बालकांसाठी 16 रुपये व अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये, असा वाढवावा, अशा मागण्या असल्याचे युनियनने आमदार कानडे यांना सांगितले. ( Maharashtra Politics News )

आमदार कानडे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी युनियनच्या रतन गोरे, निर्मला चांदेकर, शोभा वीसपुते, अनिता परदेशी, तारा आसने, नजमा शेख, शकुंतला बिलावरे उपस्थित होते. आमदार कानडे यांनी निवेदन स्वीकारून या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी सूचना मांडू, असे आश्वासन या वेळी अंगणवाडी सेविकांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT